नांदेड रुग्णालयातील मृत्यूंचे प्रकरण मुंबई हायकोर्टात!

    04-Oct-2023
Total Views |

Nanded Hospital


नांदेड :
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. गुरुवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार आहे.
 
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २ ऑक्टोबर रोजी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही हे मृत्यूसत्र सुरुच होते. त्यामुळे येथे ४८ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ नवजात बालकांचाही समावेश आहे.
 
दरम्यान, आता मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.