स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनलद्वारे इंडियाज हेअर स्‍टाइल आयकॉन २०२३ च्या विजेत्यांची घोषणा

वैविध्‍यपूर्ण "स्‍पेक्‍ट्रम" कलेक्‍शन ही लाँच केले

    31-Oct-2023
Total Views |

Strix
 
स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनलद्वारे इंडियाज हेअर स्‍टाइल आयकॉन २०२३ च्या विजेत्यांची घोषणा

वैविध्‍यपूर्ण 'स्‍पेक्‍ट्रम' कलेक्‍शन ही लाँच केले 
 
मुंबई: स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्‍यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन केलेल्‍या हेअर केअर, कलर,टेक्‍स्‍चर व स्‍टाइलसाठी प्रोफेशनल उत्‍पादक श्रेणीने प्रोफेशनल्‍सना कट, कलर व स्‍टाइलच्‍या क्षेत्रात सन्‍मानित करणारी स्‍पर्धा ' स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनल टाइम्‍स इंडिया हेअर स्‍टाइल आयकॉन २०२३ ' च्या विजेत्‍यांची घोषणा केली. प्रोफेशनल्‍ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही स्पर्धा केशभूषा उद्योगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा शोध घेते, ज्‍यांचे परीक्षण जोकिम रुस, योली टेन कॉपेल,विपुल चुडासामा,आणि सॅव्हियो जॉन परेरा यांसारखे उद्योग तज्ञ व आंतरराष्ट्रीय ख्यातनाम स्टायलिस्ट्ससह स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनलच्‍या टेक्निकल तज्ञांकडून केले जाते.
 
ग्रॅण्‍ड इव्‍हेण्‍टमध्‍ये स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनलने त्‍यांचे नवीन हेअरस्‍टाइल्‍स कलेक्‍शन स्‍पेक्‍ट्रम देखील लाँच केले. अभिनेत्री राकुल प्रीत सिंगने शोस्‍टॉपर म्‍हणून तिच्‍या मोहक लुक व अद्वितीय स्‍टाइलसह इव्‍हेण्‍टची शोभा वाढवली. स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनलचे आर्टिस्टिक अॅम्‍बेसेडर विपुल चुडासामा यांनी डिझाइन केलेल्या राकुलची ट्रेण्‍डसेटिंग केशभूषा व कलर सामंत चौहान यांच्‍या प्रेरणादायी कलाकृतीशी पूरक होत्‍या, ज्‍यामधून आकर्षक लुक निर्माण झाला.
 
स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनलचे नवीन कलेक्‍शन ' स्‍पेक्‍ट्रम ' मधून उत्‍साहपूर्ण रंगछटांची वैविध्‍यपूर्ण श्रेणी दिसून येते, जी पारंपारिक कलर पॅलेट्सच्‍या मर्यादांपलीकडे जाते. व्‍यक्‍तींच्‍या जीवनात विविध अनुभव व उत्‍साह सामावलेले असतात, अगदी तसेच या कलेक्‍शनमधील प्रत्‍येक कलर जीवनात नवीन उत्साहाचा समावेश करतो, प्रत्‍येक व्‍यक्‍तीसाठी अद्वितीय व वैयक्तिक स्‍टाइल तयार करतो. स्‍पेक्‍ट्रमचे कलेक्‍शन व्‍यक्तिमत्त्वाला साजरे करते. स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनल व्‍यक्‍तींना स्‍वत:हून त्‍यांची अद्वितीय स्‍टाइल शोधण्‍यास आणि त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्वाला अधिक आकर्षक करण्‍यास सक्षम करते. या परिवर्तनामधून त्‍यांचे विशेषत्‍व व उत्तम व्‍यक्तिमत्त्व दिसून येते.
 
हायजेनिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्‍या प्रोफेशनल डिव्हिजनच्‍या (स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनल) टेक्निकल एज्युकेशन प्रमुख श्रीमती रोशेल छाब्रा म्‍हणाल्‍या, " आम्‍हाला आमचे नवीन हेअर कलेक्‍शन स्‍पेक्‍ट्रम लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या कलेक्‍शनमध्‍ये पिवळा, हिरवा, केशरी, जांभळा अशा आकर्षक रंगसंगतींचे उत्तम संयोजन आहे. रंगांची वैविध्‍यपूर्ण, आकर्षक व परिवर्तनात्‍मक श्रेणी रंगछटांच्‍या निवडीपेक्षा अधिक आहे, ज्‍यामधून व्‍यक्तिमत्त्व, आत्‍मविश्‍वास व स्‍टाइल दिसून येतात. कोणीतरी अगदी बरोबर म्‍हटले आहे की कलर बाह्यरूप आकर्षक करण्‍यासह व्‍यक्‍तीचा मूड, वृत्ती व वर्तणूकीवर आमूलाग्र प्रभाव देखील निर्माण करतो, ज्‍यामुळे व्‍यक्‍तीचे जीवन उत्‍साहपूर्ण होते."