ब्लू डार्ट्च्या वतीने दुसऱ्या तिमाही निकालांची घोषणा, ₹1,324 कोटींची विक्री

    31-Oct-2023
Total Views |

Bluedart
 
 
ब्लू डार्ट्च्या वतीने दुसऱ्या तिमाही निकालांची घोषणा, ₹1,324 कोटींची विक्री
 
मुंबई: ब्लू डार्ट् एक्सप्रेस लिमिटेड, दक्षिण एशियाची महत्त्वपूर्ण एक्सप्रेस एअर, एकात्मिक वाहतूक आणि वितरण लॉजिस्टीक कंपनीच्या वतीने आज मुंबई येथे आज संपन्न झालेल्या बोर्ड बैठकीत 30 सप्टेंबर, 2023 रोजीपर्यंतचे तिमाही वित्तीय निकल घोषित करण्यात आले.
 
कंपनीने 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कर वजावटीनंतर नफ्यापोटी ₹71 कोटी कमावले. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कामकाजातून महसूल ₹1,324 कोटी जमा झाले.
कंपनीच्या कामगिरीवर भाष्य करताना, ब्लू डार्ट् एक्सप्रेस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर, बैलफर मैनुअल म्हणाले, " आमची लवचिकता टिकवून ठेवण्याची क्षमता पुन्हा एकदा दिसून आली आहे, आमच्या मजबूत हवाई आणि जमिनीवरील पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक समाधान पोर्टफोलिओ आणि व्यापक पोहोच यामुळे मंदावलेल्या जागतिक आर्थिक वाढीमध्ये, आम्ही केवळ महामारीपूर्व महसुलाचा टप्पा ओलांडला नाही तर ग्राहकांसाठी निवड प्रदाता म्हणून आमची स्थिती मजबूत केली आहे. ग्राहक गरजा समजून घेणे हे आमचे प्राधान्य आहे. आमच्या कामकाज उत्कृष्टतेचा पाठपुरावा करणे आणि संपूर्ण भारतामध्ये आमचा ग्राहक आधार वाढविण्यावर आमचा भर आहे.”
 
व्यवसायविषयक दृष्टिकोनाबद्दल बोलताना ते म्हणाले, “ आम्ही सध्याच्या व्यावसायिक वातावरणात आमच्या खर्चावर बारीक नजर ठेवत असलो तरी आमची मजबूत कमाई करण्याची शक्ती भविष्यातील वाढीत लक्षणीय गुंतवणूक करत राहण्याच्या स्थितीत आणते. याउपक्रमांद्वारे आम्ही शाश्वत वाढीसाठी धोरणात्मकदृष्ट्या स्थानबद्ध आहोत आणि तंत्रज्ञानाचा लाभ तसेच नवीन संधी शोधण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
 
कंपनी क्षमता विकास, डिजिटलायझेशन आणि प्रक्रियांचे ऑटोमेशन या दिशेने लक्षणीय गुंतवणूक करत आहे. 2022-23 या वर्षात ₹400 कोटी रुपयांची खरेदी केलेली दोन B737-800 विमाने मागील तिमाहीत समाविष्ट करण्यात आली असून त्यांनी चालू कालावधीत क्षमता आवश्यकतांना समर्थन दिले आहे.
 
जगातील जिओ-पॉलिटीकल अनिश्चिततेतून भारताची आर्थिक पुनर्प्राप्ती चांगली होत आहे आणि भारताच्या लॉजिस्टिक उद्योगातील अलीकडच्या घडामोडींमुळे हा मार्ग आणखी मजबूत होणार आहे. संपूर्ण भारतातील टियर I आणि II मार्केटमध्ये ब्लू डार्टची उपस्थिती सुधारली आहे. या हालचालीमुळे मोठ्या ग्राहकांना धोरणात्मक, वाढवता येण्याजोगे उपाय प्रदान करून, एंड-टू-एंड सेवा प्रस्तावासह प्रमाण अर्थव्यवस्था सक्षम करून कंपनी पोहोच वाढवायला वेग आला आहे. 15 ऑगस्ट रोजी, कंपनीने 15 कंपनीच्या मालकीच्या रिटेल स्टोअर्स, 15 फ्रँचायझी कलेक्शन सेंटर, 15 एक्सप्रेस सेलिंग एजंट्स आणि 15 प्रादेशिक सेवा प्रदाता फ्रँचायझी उदघाटनाची घोषणा केली.
 
ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानासोबतच अपवादात्मक सेवा गुणवत्ता ही प्रमुख बिंदूंपैकी एक राहिली असून ग्राहकांना त्यांच्या सर्व लॉजिस्टिक गरजांसाठी एकाच छत्राखाली त्रास-मुक्त समाधान प्रदान करते. ग्राहकांना खूश करण्याच्या प्रवासात कंपनीने 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 307,480 मेट्रिक टन वजनाची 918 लाख शिपमेंट केली.
आपल्या उत्कृष्ट मोहिमेवर लक्ष केंद्रित करून, सिंपली डिलिव्हर्ड, संस्थेने अनेक तांत्रिक उपक्रम सुरू केले आहेत जे कंपनीला तिच्या अमर्याद विकास धोरणाकडे घेऊन जातात. यातिमाहीत, ब्लू डार्टला इंडियन कार्गो अवॉर्ड्स 2023 मध्ये बेस्ट कार्गो सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून गौरविण्यात आले.
 
कंपनीला UNFCCC प्रमाणपत्र देखील हवामान तटस्थतेविषयक प्रयत्नांसाठी शाश्वतता रोडमॅपच्या दिशेने एक पाऊल म्हणून मिळाले आहे. उत्पादकता शाश्वतपणे सुधारण्यासाठी ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन उपक्रमांमध्ये अतिरिक्त निधी गुंतवला गेला. कंपनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत उपायांवर काम करत आहे, ज्यात इलेक्ट्रिक वाहने तैनात करणे, कागदाचा वापर कमी करणे, हरित सुविधा इ.आजपर्यंत, कंपनीने कार्बन फूटप्रिंट ऑफसेट करण्यासाठी 6,66,000+ झाडे लावली आहेत. त्याच्या ईएसजी प्रवासाचा एक भाग म्हणून, ब्लू डार्ट अनुपालनाची सर्वोच्च मानके राखण्यासाठी समर्पित आहे.
 
संस्थेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसर्‍या तिमाहीत सर्व भागधारकांसाठी प्रोव्हायडर ऑफ चॉईस, एम्प्लॉयर ऑफ चॉईस, इनव्हेस्टमेंट ऑफ चॉईस म्हणून एक आदर्श प्रस्थापित केला आहे.