टियर १ शहर रियल इस्टेटमधील कर्मशिअल संपत्ती पुरवठ्यात ७ टक्यांने वाढ
प्रॉपइक्विटीने दिलेल्या अहवालानुसार टियर १ शहरात व्यवसायिक संपत्तीची वाढती मागणी
मुंबई: आर्थिक वर्ष २०२३ तिसऱ्या तिमाहीत टियर १ शहरांच्या रिअल इस्टेटमधील पुरवठ्यात ७ टक्यांनी वाढ झाली असल्याचा अहवाल प्रॉपइक्विटीने दिला आहे. एकूण कर्मशिअल रियल इस्टेट १४.६१ मिलियन स्क्वेअर फूट जागेचा पुरवठा वाढल्याचे या अहवालात नमूद केले आहे. विशेषतः हैदराबाद, बंगलोर अशा आयटी प्रणित हब असलेल्या क्षेत्रातील बूस्टमुळे इकडील रियल इस्टेटमध्ये मोठी तेजी दिसून आली.
सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णय,सवलत, टॅक्स सवलत, इन्सेंटीव्ह यामुळे आयटी क्षेत्रातील वाढलेली क्रयशक्ती यामुळे रियल इस्टेट मार्केटमध्ये पुरवठा वाढला आहे. या प्रारुपातील शहरांमध्ये हैद्राबाद हे क्रमांक १ चे शहर ठरले असून तब्बल ३५ टक्यांने जागांचा पुरवठा येथे वाढला आहे. या खालोखाल बंगळुरू २५ टक्के ठरले आहे.
यावेळी निव्वळ वहिवाट ( Net Occupancy) मध्ये मागील १०.२१ टक्यांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत १२.३१ टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. एकूणच कर्मशिअल संपत्तीच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवसागणिक वाढत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील चळवळी पाहता भविष्यात याहून अधिक कर्मशिअल संपत्तीच्या मागणीत वाढ होऊ शकते. टियर १ व टियर २ ही आगामी काळातील रियल इस्टेट मार्केट मधील महत्वाची केंद्रे असतील. टियर १ मध्ये MMR येथे सर्वात जास्त Net Occupancy असून त्याखालोखाल दिल्ली एनसीआर मध्ये आहे.