धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे ‘पंचक’च्यानिमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण

    27-Oct-2023
Total Views | 28

madhuri 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित. ८०-९०च्या दशकापासून प्रेक्षकांना आपल्या आभिनय आणि नृत्याच्या अदाकारीने घायाळ करणारी माधुरी आता दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने ‘पंचक’ या तिच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली असून माधुरी व तिचे पती श्रीराम नेने हे दोघेही या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. याच मालिकेतील अभिनेत्री नंदिता पाटकर माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ या चित्रपटात काम करणार आहे.
 

panchak 
 
नंदिताने तिच्या सोशल मिडियावर ‘पंचक’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यामुळे नंदिता माधुरीच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं निश्चित झालं आहे. या चित्रपटात ती कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ चित्रपट पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात नंदितासह आदिनाथ कोठारे, सतीश आळेकर, दीप्ती देवी पाहायला मिळणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..