पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा जुलैमध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (टंकलेखन) परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
तसेच, टायपिंगचा निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षार्थ्यांना निकालापासून १० दिवसांत गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती, तसेच पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहायक आयुक्त संगीता घोडेकर यांनी केले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच, सदर निकालाची ऑनलाइन प्रिंट घेता येणार असून विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येतील.