माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे काळाच्या पडद्याआड!

    27-Oct-2023
Total Views |

Babanrao Dhakane


मुंबई :
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून बबनराव ढाकणे हे न्युमोनिया आजाराने त्रस्त होते. अहमदनगरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात त्यांनी विशेष काम केले.