आयकर फाईलिंग २०२२ पर्यंत ९ वर्षात ९० टक्के वाढ
नवी दिल्ली: २०१४ ते २०२२ या नऊ वर्षांत वैयक्तिक पर माणशी आयकर टॅक्स फाईलिंग मध्ये थेट ९० टक्के वाढ झाली आहे. वित्त मंत्रालयाने एका जाहीरनाम्यात हे सर्वेक्षण केल्याचे सांगितले आहे. आर्थिक वर्ष १३-१४ मध्ये ६.३६ कोटींवरून आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये ६.३७ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ५३ लाख जणांनी पहिल्यांदा फाईलिंग केले आहे. वेगवेगळ्या करप्रणालीतील प्रवर्गानुसार विभागाने यांचे वर्गीकरण केले आहे. १३-१४ ते २१-२२ दरम्यान ५ ते १० लाख कर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये २९५ टक्यांने वाढ झाली आहे. १० ते २५ लाख कर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये २९१ टक्के वाढ झाली आहे. ५ लाखांपर्यंत कर भरणाऱ्या लोकांमध्ये २.६२ करोडने वाढ झाली आहे.
उत्पन्नात वाढ
आर्थिक वर्ष १३-१४ व २१-२२ मध्ये कर भरणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नात ५६ टक्के इतकी वाढ झाली आहे. ४.५ लाखांच्या उत्पन्नावरून ७ लाखांपर्यंतची वाढ झाली.
प्रत्यक्ष करभरणीत वाढ
निव्वळ प्रत्यक्ष कर आर्थिक वर्ष १३-१४ मध्ये ६.३८ लाख कोटींवरून २२-२३ मध्ये १६.६१ लाख कोटी रुपये इतका वाढला आहे.