बियाणे निर्यात बाजारपेठेत प्रमुख स्थान मिळवण्याचे भारताचे ध्येय

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

    26-Oct-2023
Total Views |
amit shah

नवी दिल्ली :
भारतासारख्या मोठ्या विशाल कृषीप्रधान देशाने जागतिक बियाणे बाजारपेठेत मोठा वाटा मिळवण्यासाठी कालबद्ध लक्ष्य निश्चित केले पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बियाणे सहकारी संस्था लिमिटेडची (बीबीएसएसएल) स्थापना केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरूवारी केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बीबीएसएसएलतर्फे आयोजि "सहकारी क्षेत्रातील सुधारित आणि पारंपारिक बियाणे उत्पादनावरील राष्ट्रीय चर्चासत्रा"स संबोधित केले. ते म्हणाले, कृषीची सुरूवात झालेल्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. त्यामुळे भारतीय पारंपरित बियाणे गुणवत्तेमध्ये सर्वोत्तम आहेत. भारतातील पारंपारिक बियांचे संवर्धन करून ते येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणे आणि निरोगी धान्य, फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन सुरू करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी बीबीएसएसएलकडे जबाबदारी देण्यात आली आहे, असे शाह म्हणाले.

भारतीय कृषी शास्त्रज्ञांना चांगले व्यासपीठ मिळाल्यास ते जगातील सर्वाधिक उत्पादन देणारे बियाणे बनवू शकतात, असे गृह व सहकारमंत्री शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जगात बियाणांच्या निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ आहे आणि त्यात भारताचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतासारख्या मोठ्या आणि कृषीप्रधान देशाला मोठा वाटा मिळावा यासाठी कालबद्ध लक्ष्य निश्चित केले पाहिजे. जागतिक बियाणे बाजारात. मोदी सरकारने या उद्दिष्टांना समोर ठेवून बीबीएसएसएलची स्थापना केली असून काही वर्षांत ही समिती जगात आपले नाव निर्माण करेल आणि देशातील शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात मोठे योगदान देईल, असेही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी नमूद केले आहे.