पर्यावरणातील नवदुर्गा : जुई पेठे

    23-Oct-2023
Total Views |
jui pethe

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...

वनस्पतीप्रेमी जुई पेठे महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अमरावती या चार जिल्ह्यांतील १०० गावांमध्ये ‘रीडस’ या संस्थेअंतर्गत काम करत आहेत. 'research in environment education development society' या संस्थेच्या माध्यमातून जमीन, जंगल, पशुधन आणि स्थानिक समाज या संसाधनांना मजबूत कसे करता येईल, यावर त्या काम करत आहेत.

यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘नवदुर्गा सन्मान’ या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले असून भारत सरकारच्या वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क कायदा संरक्षण प्राधिकरणाच्या त्या सदस्यादेखील आहेत. लोकांना असलेल्या पारंपरिक ज्ञानाचे डॉक्युमेंटेशन करून त्यावर आधारित काही नर्सरी निर्माण करणे, बांबू विषयावर काम करणे, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पारंपरिक वाणांचे डॉक्युमेंटेशन होऊन जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत ते पोहोचवणे या सगळ्या विषयांवर त्यांना भविष्यात काम करायचे आहे.

संकलन आणि शब्दांकन : अंवती भोयर , समृध्दी ढमाले