स्थिर महसूल वाढीमुळे वित्तीय स्थिती भक्कम व महागाई मर्यादेत - अर्थमंत्रालय अहवाल
नवी दिल्ली: अलीकडच्या काळात मजबूत खाजगी वापरामुळे भारतीय आर्थिक विकासाला चालना मिळत असून, विकासाचे दोन नवे वाहक उदयास आले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या ताज्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की, स्थिर महसुली वाढीमुळे भारताची वित्तीय स्थिती भक्कम असून महागाई लक्ष्याच्या मर्यादेतच राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय भारताची आर्थिक स्थिती मजबूत असून चांगले महसूल उत्पन्न मिळवून मर्यादित महागाई दर कायम राहण्याची चिन्हे आहेत. तरी देशातील मॅक्रो फंडामेंटल भक्कम असले तरी अर्थव्यवस्थेतील जागतिक आव्हानं व हवामानातील अनिश्चितता पाहता नकारात्मक जोखीम सुद्धा दिसते असे यात मंत्रालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, औद्योगिक कार्यात तेजीने कार्य हे विकासाचा चालक असेल. मजबूत बँकिंग व्यवस्थेबरोबरच गुंतवणुकीच्या नव्या हालचालींसह कॉर्पोरेट ताळेबंदातील सुधारणा यामुळे हा दृष्टीकोन अधिक उज्ज्वल होतो, असे अहवालात म्हटले आहे.