“...आणि त्या ८५ वर्ष गृहस्थांनी”, आनंददोह नाट्यप्रयोगाचा ‘तो’ अविस्मरणीय अनुभव सांगताना योगेश सोमण

    21-Oct-2023
Total Views |

ananddoh 
 
रसिका शिंदे-पॉल
  
मुंबई : रंगभूमी ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एक अग्रेसर नाव म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक योगेश सोमण. प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी राहीली पाहिजे असा जणू काही नकळत अट्टहास करत योगश सोमण त्यांच्या प्रत्येक कलाकृती घडवत असतात. मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला. यासोबतच ‘अनादि मी अवध्य मी’, ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांनीही यश मिळवले. याव्यतिरिक्त आनंदडोह या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर लिहिलेल्या एकपात्री नाट्य प्रयोगातून त्यांनी आगळावेगळा विक्रम केला आहेच. पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांच्या ‘आतुर’ या चित्रपटातुन ते प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने योगश सोमण यांनी ‘महाएमटीबी’शी संवाद साधला. यावेळी सोमण यांनी आनंदडोह या एकपात्री नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान मिळालेली दाद सांगितली.
 
आनंदडोह या एकपात्री नाट्यप्रयोगाची एक आठवण
 
‘आनंदडोह’ या एकपात्री नाटकात मी संत तुकाराम महाराज साकारत असताना माझ्यासाठी ती साधना आहे. या प्रयोगाचा एक क्षण फार लक्षात राहण्यासारखा होता. यंदा तुकाराम महाराजांच्या वारीतून मी पुणे विद्यापिठाच्या एनएसएस विभागातर्फे आनंदडोहचे प्रयोग करत होतो. त्यावेळी तेथील वारकरी हे केवळ मला तुकाराम महाराज समजून माझा आर्शिवाद घेणं यापलिकडे वारकऱ्यांसाठी तुमाकाम महाराज काय होते याची प्रचिती मला आली. ८०-८५ वर्षांचे एक गृहस्थ तो प्रयोग बघायला आले होते. प्रयोग संपला, सगळे निघून गेले पण ते तिथेच बाहेर उभे होते. का कोणास ठाऊक मी देखील त्यांच्यासमोर त्याच वेशात गेलो आणि त्यांनी मला हात धरुन जवळ ओढल, मला वारकर ज्या पद्धतीचा नमस्कार करतात तसा नमस्कार केला आणि चक्क आई जशी लहान मुलाचे गाल ओढून, गालावरुन हात फिरवत लाड करते तसे ते माझे म्हणजेच तुमकाराम महाराजांचे लाड करत होते. तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. कारण त्यावेळी मला त्या गृहस्थांच्या नजरेत आणि स्पर्शात केवळ तुकाराम महाजांसाठी असलेला आदर आणि प्रेमच दिसत होता”, अशा विलोभणीय क्षण सोमण यांनी सांगितला.