मुंबई : डीजिटल लॉकर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या सुविधेमुळे नागरिकांना कुठेही जाताना त्यांचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र मोबाईलमद्धे डिजीटल लॉकरच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात ठेवता येणार आहेत.
ज्यामुळे आता कागदपत्रांची मुळप्रत सोबत बाळगायची आवश्यकता नसून इंटरनेटवर अवलंबून असलेल्या या सेवेमार्फत तुम्ही जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्रांसारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन ठेवू शकता. या पोर्टलच्या साहाय्याने ई-दस्तावेजांचे अदान-प्रदान नोंदणीकृत माध्यमातून केले जाईल, ज्यामुळे या ऑनलाईन कागदपत्रांचे प्रमाणिकरण अबाधित राहील.
डिजीलॉकर अकाऊंट तयार करण्याच्या पायऱ्या :
- सर्वात अगोदर तुम्ही या योजनेच्या digitallocker.gov.in या संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक करा.
- येथे तुम्ही ईमेल-आयडी, पासवर्ड किंवा आधारकार्डच्या मदतीने अकाऊंट सुरू करू शकता.
- त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडीवर पडताळणीसाठी लिंक पाठवली जाईल.
- लिंकची पडताळणी झाल्यानंतर तुमचे अकाऊंट सुरू होईल.
- त्यानंतर तुम्ही तुमचा युजर आयडी व पासवर्डद्वारे येथे लॉग इन करू शकता.
- तुम्ही तुमची शैक्षणिक कागदपत्रे व ओळखपत्र तसेच रहिवासी प्रमाणपत्र येथे स्कॅन करुन अपलोड करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला डिजीटल स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.