राऊतांच्या नावाचा वापर करून सुजीत पाटकरांनी मिळवले ३३ कोटीचे कोविड टेंडर!
02-Oct-2023
Total Views |
मुंबई : जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, पाटकर यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. वरळी आणि दहिसर कोविड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसंदर्भात पाटकर यांनी जयस्वाल यांची भेट घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती.
याच लोकांना जो खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट् मिळाला त्यातले पैसे संजय राऊतची सुपुत्री आणि भावाच्या खात्यात गेले आहे.
संजय राऊतांच्या नावाचा वापर करून ३३ कोटी ६० लाखांचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. या कॉन्ट्रॅक्टविषयी संजय राऊतांना माहित होते. वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती. याच लोकांना खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्यातले पैसे संजय राऊतांची मुलगी आणि भावाच्या खात्यात गेल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.