छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष व विश्व हिंदू परिषदेचेही हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बजरंग दलाच्यावतीने सिंधुदुर्ग ते मुंबई अशा १६ दिवसांच्या ‘शिवशौर्य यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समापन समारोह रविवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दादर पश्चिम येथील राजा बढे चौक येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेली ‘शिवशौर्य यात्रा’ रत्नागिरी, रायगड, कल्याण, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई, भाईंदर मार्गे रविवारी मुंबईत आली. दरम्यान समापन समारोहात मंचावर संन्यास आश्रम मुंबईचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज, ख्यातनाम अभिनेते आणि ऐतिहासिक व्याख्यानकार डॉ. राहुल सोलापूरकर, लेफ्ट. कर्नल (नि) मनोज कुमार सिन्हा, लेफ्ट. कर्नल (नि) जगदीप सिंग मनचंदा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, विहिंपचे केंद्रीय उपाध्यक्ष अशोकराव चौगुले, ज्येष्ठ गायक भजनसम्राट अनूप जलोटा, राज दत्तजी, बजरंग दलचे कोकण प्रांत अध्यक्ष जोगसिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, इस्रायल-‘हमास’ युद्धाबाबत बोलताना सुरेंद्र जैन म्हणाले, “काही लोक आज ‘हमास’चे समर्थन करत आहेत. ‘हमास’चे समर्थन करून मुस्लीम मतपेटी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरातील मुस्लीम समाज ‘हमास’च्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने उभा आहे हे दुर्दैवी आहे. स्त्रियांवरील अत्याचार, मंदिरे उद्ध्वस्त करणे हे प्रकार मागील १४०० वर्षे होत आले आहे. त्याचप्रकारची कृत्य आजही घडताना दिसत आहेत. विहिंप पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी आहे.पॅलेस्टाईनचे (हमासच्या कृत्याचे) समर्थन राजकीय वर्तुळातही होत असून अशा समर्थकांवरही सुरेंद्र जैन यांनी निशाणा साधला आहे.”
उद्धव ठाकरेंचं नाव घेता ते म्हणाले, “काँग्रेसची आताची अवस्था सर्वांना ठाऊक आहेच, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्यांची अवस्था त्याहून बिकट झाल्याचं दिसत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कर्मठ हिंदुत्त्ववाद्याप्रमाणे भूमिका घेऊन जिहादी विचारांच्या लोकांचा विरोध केला. पण त्यांचे वंशज आज जिहादींचेच समर्थन करताना दिसतायत.” बजरंग दल आणि हिंदू बांधवांना आवाहन करत ते म्हणाले, “बजरंग दलाचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे. तेच शौर्य आजही प्रत्येक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामध्ये दिसत आहे. आजचा हिंदूदेखील पूर्वीसारखा राहिलेला नाही. तोही जागा झाला आहे. आजचा हिंदू जिहादी प्रवृत्तीला थेट विरोध करू लागलाय. भारतभर झालेल्या ‘शिवशौर्य यात्रे’तून हिंदूंची ताकद दिसून आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नामांतराच्या रुपातून एक पाऊल उचलले आहेच, आता हिंदू बांधवांनाही महाराष्ट्र जिहादमुक्त करायचा आहे. महाराष्ट्र नव्याने भगवामय करायचा आहे.”
यावेळी ऐतिहासिक व्याख्यानकार राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगणार्यांना चांगलेच सुनावले. महाराजांकडे असलेल्या मुस्लीम सैनिकांच्या संख्येबाबत होणार्या अपप्रचाराला प्रत्युत्तर दिले आहे. महाराजांच्या सैन्यात ४३६ मराठे आणि केवळ दोन मुसलमान सैनिक होते, याचा संपूर्ण खुलासा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे फसव्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी हिंदूंना केले आहे. हिंदूधर्म लेचापेचा नाही हे शिवशौर्य भारतभर दाखवून दिले. असे म्हणत त्यांनी हिंदूंमध्ये आपल्या भाषणातून ऊर्जा निर्माण केली. त्याचप्रमाणे रा.स्व.संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, लेफ्ट. कर्नल (नि) मनोज कुमार सिन्हा, बजरंग दलचे कोकण प्रांत अध्यक्ष जोगसिंह, बजरंग दलचे कोकण प्रांत संयोजक संदीप भगत, महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज, लेफ्ट. कर्नल (नि) जगदीप सिंग मनचंदा यांचीही भाषणे झाली. शिवशौर्य यात्रेच्या मुंबईतील समापन समारोहास दहा हजारांहून अधिक हिंदू उपस्थित होते.
मुंबई : “ज्याप्रमाणे महिशासुर राक्षसाचा वध करण्यात आला, अफजलखानसारख्या एका जिहादीचा वध करण्यात आला, त्याप्रमाणे आता आपल्यालाही भारतातील जिहादी प्रवृत्तीचा वध करायचा आहे. भारतात राहून ‘हमास’सारख्या जिहादींना आज समर्थन करणारे उद्या पाकिस्तानलाही समर्थन द्यायला कमी करणार नाही. अशा जिहादींविरोधात हिंदू एकजुटीने संघटित होऊ पाहतोय,” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी मुंबईत केले.
यात्रेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये शौर्य जागवले
सिंधुदुर्गापासून सुरू झालेल्या यात्रेचा समारोप १६ दिवसांच्या प्रवासानंतर मुंबईत झाला. यात्रेच्या माध्यमातून हिंदू तरुणांमध्ये छत्रपती शिवरायांचे शौर्य जागवण्याचा प्रयत्न होता. त्याचप्रमाणे हिंदू समाजापुढे येणार्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हिंदूंमध्ये ऊर्जा, जिद्द, शक्ती निर्माण व्हावी, हा यात्रेमागचा उद्देश होता. आज तो सफल झाल्याचे दिसत आहे. ७०२ नव्या समित्यांची स्थापना या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे देव, देश, धर्मासाठी हिंदू समाज नक्कीच पुढे येईल, याची खात्री झाली आहे.
-
मोहन सालेकर, कोकण प्रांत मंत्री, विहिंप
युवावर्गाचा आव्हानांना सामोरे जाण्याचा संकल्प
संपूर्ण देशभरात शौर्य जागरण यात्रा यशस्वीपणे झाली. आठ हजार यात्रांच्या माध्यमातून ८० हजार गावांमध्ये संपर्क करण्यात आला. संपूर्ण देशभरातील युवावर्गाने भारतापुढे येणार्या आव्हानाला सामोरे जाण्याचा संकल्प हाती घेतल्याचे शिवशौर्य यात्रेदरम्यान दिसून आले. त्यामुळे आता ‘लव्ह जिहाद’, जिहादी धर्मांधता यांसारख्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ही सभा पार पडली, त्यामुळे हाती घेतलेला संकल्प नक्कीच पूर्ण होईल याची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. सुरेंद्र जैन यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.