‘सीएस’विषयी बोलू काही...

    20-Jan-2023   
Total Views |

कंपनी सेक्रेटरी

कंपनी सेक्रेटरी किंवा ‘सीएस’ थोडक्यात, कोणत्याही सरकारी/खासगी कंपनीचा कर्मचारी असतो, जो कंपनीमधील वैधानिक, नियामक आणि कायदेशीर आवश्यकतांचे पालन आणि कार्यक्षम प्रशासनासाठी जबाबदार असतो. कंपनी संचालकांनी घेतलेले निर्णय संबंधित कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांमार्फत नियमानुसार कायदेशीररित्या अमलात आणणे, ही कंपनी सचिवाची जबाबदारी. त्याविषयी गेल्या 35 वर्षांपासून या क्षेत्राविषयी आपल्या वैयक्तिक अनुभवांतून मार्गदर्शन, समुपदेशन करणार्‍या नेहा कारेकर यांनी याविषयी मांडलेले विचार...



पल्या सर्वांनाच चार्टर्ड अकाऊंटंट, कंपनी सेक्रेटरी ही पदं साधारण ऐकून माहिती असतात. काही जणांना या दोन्ही पदांच्या कार्यशैलीची नेमकी माहिती असली तरी अजूनही काहींना या दोघांमधला नेमका फरक काय? या पदावरील माणसं नेमकं काय काम करतात? याची सखोल माहिती नसते. तेव्हा नेहा कारेकर आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून नवीन पिढीला याविषयी सविस्तर माहिती देतात. नेहा सांगतात की, “प्रत्येकाने आपली ‘पॅशन’ सांभाळली पाहिजे. मला लिहायला, वाचायला, नवनवीन गोष्टी शिकायला फार आवडतात. मी ‘कॉस्टेल मॅनेजमेंट अकाऊंटिंग’ केले. एलएल.बी पूर्ण केले.



मुंबई युनिव्हर्सिटीमधून एम.ए पाली भाषेत केलं. त्यानंतर मानसशास्त्रामध्ये एम.ए केलंच, तसेच बुद्धिस्ट स्टडीज्मध्येही एम.एचे शिक्षण घेतलं. आता ते विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी ऑनलाईन कोर्सेस रेकॉर्ड करते. दरवर्षी दोन-तीन डिप्लोमा कोर्सेसदेखील मी करत असते. कारण, ‘कंपनी सेक्रेटरी’ म्हणून स्वतःला ‘अपडेटेड’ ठेवणं खूप गरजेचं आहे. मी एक पुस्तक ही लिहिले आहे. ’पॉवर ऑफ न्युरो लिग्विस्टिक प्रोग्राम‘असे त्याचे नाव आहे. हे पुस्तक ‘अ‍ॅमेझॉन’वरदेखील उपलब्ध आहे. मी ‘कॉर्पोरेट ट्रेडिंग’सुद्धा करते. ‘कॉर्पोरेट्स बँक’मध्ये जाऊन लोकांना शिकवते. त्यामुळे आपल्या कामांना आपण आपल्या छंदाची जोड देऊ शकतो.”

‘नेहा कारेकर अ‍ॅण्ड असोसिएट्स’ ही त्यांची कंपनी. आपल्या कंपनीच्या अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणतात, “चार्टर्ड अकाऊंटंट हे रेव्हेन्यू आणि ऑडिटचं काम करतात. कंपनी सेक्रेटरीकडून कंपनीच्या कायद्यांसंबंधी काम पाहिले जाते. म्हणजेच, चार्टर्ड अकाऊंटंट कंपनीच्या वर्षभराची ‘बॅलन्स शीट’ (ताळेबंद) पाहतो, तर कंपनी सेके्रटरी ‘बॅलन्स शीट’ पाहिल्यानंतर ती फाईल करून पुढे ‘मिनिस्ट्री ऑफिस’ला पाठवतो. हा या दोघांमधला फरक असल्याचे नेहा सांगतात. ‘कंपनी सेक्रेटरी’ ही कंपनीला ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर’ला साहाय्य करणारी व्यक्ती असते. त्यामुळे बारावीनंतर ‘कंपनी सेक्रेटरी’ क्षेत्रामध्ये करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत. यासाठी नेहा कारेकर त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘करिअर’ मार्गदर्शनही करतात. ‘कंपनी सेक्रेटरी’हे अत्यंत जबाबदारीचे पद असते, ‘कंपनी सेक्रेटरी’ कंपनीचे ‘शेअरहोल्डर्स’, ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ तसेच कर्मचार्‍यांशी सातत्याने संपर्कात असते. जर कोणत्या विद्यार्थ्याला लिखाणाबद्दल किंवा कायद्यांबद्दल अधिक आवड असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच ‘कंपनी सेक्रेटरी’ पदासाठीचा औपचारिक कोर्स करण्याचे आवाहन नेहा करतात. ’कंपनी सेक्रेटरी’ हे क्षेत्र मुलींसाठी खूप फायदेशीर ठरू शकते, असे नेहा मानतात. कारण, काही ठिकाणी या पदासाठीचे काम घरी बसून म्हणजेच, ’वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने देखील केले जाऊ शकते. नेहा कारेकर यांच्या ‘कंपनी सेक्रेटरी इन्स्टिट्यूट’चे 50 हजार सदस्य आहेत, तर या इन्स्टिट्यूटची विद्यार्थीसंख्या दोन लाख इतकी आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘कंपनी सेक्रेटरी’ पदासाठीचा कोर्स करता येतो. नेहा म्हणतात की, करिअरच्या दृष्टिकोनातून हा कोर्स खूपच फायदेशीर आहे. शिवाय भविष्यात या कोर्समुळे या क्षेत्रातील रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे त्या म्हणतात.


नेहा यांच्या मते, कंपनीला जन्म घालणारा हा ‘कंपनी सेक्रेटरी’च असतो. त्यामुळे ‘कंपनी सेक्रेटरी’ला काम करताना अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. तसेच ‘कंपनी सेक्रेटरी’ अशाच त्या-त्या कंपनीतील विविध समस्यांचा सामना करून संबंधित उद्योगाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये कंपनीची वार्षिक दस्तावेज नोंदणी, केवायसी, कंपनीमध्ये गुंतवलेल्या पैशांचे फॉर्म्सदेखील ‘कंपनी सेक्रेटरी’ला प्रसंगी तपासावे लागतात. ‘कंपनी सेक्रेटरी’ कंपनीमध्ये सर्व्हिस करत असतो किंवा कंपनीमध्ये स्वतःसाठी ‘सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस’ करत असतो. साधारणतः ‘कंपनी सेक्रेटरी’ने एलएल.बीचा अभ्यास केलेला असावा. कारण, कंपनीच्या कामकाजासाठी आवश्यक कंपनी कायदा त्या व्यक्तीला पूर्णपणे ज्ञात असणे गरजेचे असते. त्याचबरोबर ‘कंपनी सेक्रेटरी’ने सतत येणार्‍या ‘अपडेट्स’बद्दल जागरूक असावे. ‘कंपनी कायदा, 2013’ने विविध प्रकरणांसंदर्भातील ’कंपनी पेनल्टी’ देखील कडक केल्या आहेत. त्यामुळे नेहा सांगतात की, जर तुम्ही एखादा फॉर्म वेळेत संबंधित यंत्रणेकडे ‘फाईल’ केला नाही, तर दंडाची रक्कम भरावी लागते. म्हणून ‘कंपनी प्रॅक्टिसिंग सेक्रेटरी’चा ‘स्कोप’ खूप वाढला आहे. ‘कंपनी कायदा 2013’ नंतर, ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ला वर्षाला सहा ‘कम्प्लायन्सेस’ असतात. ते पूर्ण करणे गरजेचे असून तीदेखील कंपनी सेक्रेटरीचीच जबाबदारी असते.



 
‘कंपनी सेक्रेटरी’सारख्या तुलनेने कमी माहिती असणार्‍या या क्षेत्राबद्दल नेहा कारेकर माहितीसोबतच आपला अनुभवही कथन करतात. त्यातच 35 वर्षांच्या अनुभवातून त्यांनी आपली आवड कशी जोपासली, हेदेखील त्या आवर्जून सांगतात. नेहा कारेकर आपल्या वैयक्तिक अनुभवातून प्रत्येकाने आपला ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ कसा सांभाळला पाहिजे, यासंदर्भात देखील मार्गदर्शन करतात. नेहा यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

(शब्दांकन : साक्षी कार्लेकर)



हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.