भारतात चित्त्यांनी घेतला पहिल्या जेवणाचा आस्वाद

चित्त्यांकडून कुतूहलाने नवीन परिसराचे निरीक्षण

    23-Sep-2022
Total Views |
Leopard
 
मुंबई : नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी दोन भावंडं 'फ्रेडी' आणि 'अल्टोन' मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये खेळताना दिसल्याचे, उद्यान प्रशासनाने सांगितले आहे. रविवार दि. १८ रोजी संध्याकाळी एका दिवसानंतर त्या सर्वांना भारतात आल्यापासून पहिल्यांदाच जेवण दिले गेले.
 
 
रविवारी सायंकाळी प्रत्येकी आठ चित्त्यांना दोन किलो म्हशीचे मांस देण्यात आले. त्यापैकी फक्त एकाने कमी खाल्ले, अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी दि. १९ सप्टेंबर रोजी चित्ते आनंदी आणि सक्रिय दिसत होते. हे प्राणी तीन दिवसांतून एकदा अन्न खातात. नामिबियामध्ये आठ चित्त्यांना त्यांची नावे देण्यात आली. "सध्या त्यांची नावे बदलण्याची आमची योजना नाही," असे अधिकारी म्हणाले. भारत आणि नामिबियातील पशुवैद्य आणि तज्ज्ञ चित्तांवर बारीक नजर ठेवून आहेत. या चित्त्यांना एका महिन्यासाठी विलागीकरणात ठेवले जाईल.