देशविरोधी हिंसाचारात आमचाच सहभाग ; सीपीआय माओवादी गटाची कबुली
कम्युनिस्ट पक्षाच्या पत्रकात धक्कादायक खुलासे
19-Sep-2022
Total Views |
मुंबई : सरकारने बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या माओवादी गटाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. सीपीआयच्या या माओवादी गटाने काढलेल्या एकवीस पाणी पत्रकात देशात मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या समाजविरोधी आणि सरकार विरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याची कबुली देण्यात आली आहे. तसेच पक्षाच्या समर्थकांना आपल्या संघटनेचा प्रभाव वाढविण्यासाठी काही संघटनांना सोबत घेऊन सरकारच्या विरोधात जनभावना भडकविण्यासह आंदोलने करण्यास भाग पाडण्याचे देखील या पत्रकात म्हटले आहे. तसेच दिल्ली येथे कृषिविधेयकांच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करून ते घडवण्यात आपला सहभाग असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेने काही दावे केले आहेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) गटाच्या अठराव्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या केंद्रीय समितीकडून पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तींसह काही मंडळींना हे एकवीस पानी पत्र लिहिण्यात आले आहे. पत्राद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच या पत्रातून पक्षाच्या सदस्यांना आणि पाठिंबा देणाऱ्या संघटनांना देशातील नागरिकांच्या मनात हिंसा भडकविण्याचे आणि त्यांना हिंसेसाठी प्रवृत्त करण्याची चिथावणी देखील देण्यात आली आहे.
पत्रातील मजकूरात म्हटले आहे की, 'माओवादी विचारसरणीच्या प्रभावामुळे आणि चळवळीमुळे देशात काही ठिकाणी हिंसा भडकविण्यात आणि आंदोलने छेडण्यात संघटलेला यश आले आहे. ओडिशा, तेलंगणसह छत्तीसगढ आणि इतर काही भागांमध्ये हे प्रकार सरकारच्या दबावाला न जुमानता हे प्रकार घडले आहेत. दिल्ली येथे कृषी विधेयकाच्या विरोधात झालेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले होते, हे देखील आम्ही केल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या 'अग्निवीर'या सैन्य भरतीशी संबंधित असलेल्या उपक्रमाबाबत घडलेल्या हिंसेला देखील आपणच जबाबदार असल्याचे माओवाद्यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांकडून ठार करण्यात आलेल्या मिलिंद तेलतुंबडेच्या मृत्यू बाबत देखील या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.'
आंदोलने भरकटवुन हिंसा घडवण्याचे षड्यंत्र
'माओवाद्यांच्या वतीने काही वर्षांत सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर होणाऱ्या कार्यक्रम आणि आंदोलनांमध्ये घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. भीमा कोरेगांव येथे मानवंदना देण्यासाठी एकत्रित झालेल्या समुदायात काही असामाजिक घटक घुसवून घडवून आणलेली हिंसा त्यातील एक भाग होता. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनावेळी नक्षलवादी कारवायांमुळे अटकेत असलेल्या आरोपींना मुक्त करण्याची केलेली मागणी असेल किंवा देशातील सामाजिक आंदोलनामध्ये घुसून त्याची दिशा बदलून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न या प्रयत्नांतून सलोख्याने राहणाऱ्या समाजात अशांतता पसरविण्याचे आणि हिंसा भडकविण्याचे षड्यंत्र या माओवाद्यांकडून रचण्यात आल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.'
- सागर शिंदे, राज्य संयोजक, विवेक विचार मंच, महाराष्ट्र
19 September, 2022 | 20:20
कुटुंबियांना बोलण्याची परवानगी
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगांव येथील हिंसाचार प्रकरणात आणि पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी असलेल्या आनंद तेलतुंबडेसह इतर ५ आरोपींना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, वरील आरोपी कुटुंबियांशी केवळ ३ मिनीटे फोनवर बोलू शकतील असे मुंबई सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.