अमित शाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा तेलंगणामध्ये भंग

तेलंगणा राष्ट्रसमितीच्या नेत्याचे वाहन शाहांच्या ताफ्यासमोर

    17-Sep-2022
Total Views |

amit shah
 
 
 
नवी दिल्ली Amit Shah, Hyderabad Liberation Day : हैदराबाद दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सुरक्षेचा भंग झाल्याचे प्रकरण समोर आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा जात असताना अचानक तेलंगणा राष्ट्रसमिती पक्षाच्या (टिआरएस) नेत्याने आपली मोटार त्यांच्या ताफ्यासमोर लावली. हे पाहून सुरक्षा कर्मचारी सक्रिय झाले आणि त्यांनी तात्काळ वाहन घटनास्थळावरून हटवले. ताफ्यासमोर मोटार लावणाऱ्या टीआरएस नेत्याचे नाव गोसुला श्रीनिवास असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
हैदराबाद मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हैदराबाद दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या सुरक्षाव्यस्थेचा भंग होण्याची गंभीर घटना शनिवारी घडली. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या ताफ्याच्या मार्गावर टिआरएस नेते गोसुला श्रीनिवास यांची अचानकपणे आपली मोटार उभी केली, त्यामुळे घटनास्थळी खळबळ उडाली. त्यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ ते वाहन तेथून दूर केले. मात्र, यामुळे केंद्रीय मंत्री शाह यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. या घटनेनंतर श्रीनिवास यांनी सांगितले की, गाडी अचानक ताफ्यासमोर थांबली. ही बाब लक्षात येण्यापूर्वीच गृहमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तोडफोड केल्याचा दावा त्यांनी केला.
 
 
दरम्यान, गेल्या १३ दिवसांत गृहमंत्री शाह (Amit Shah) यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भंग होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ४ – ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शाह (Amit Shah)  यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या होत्या. शहा यांच्या मुंबई भेटीदरम्यान एक संशयित अनेक तास त्यांच्याभोवती घुटमळत होता. सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला तासात अटक केली होती.