महाराष्ट्रात उमेश कोल्हे प्रकरणाची पूनरावृत्ती !

नगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

    06-Aug-2022
Total Views | 364

ahmednagar


मुंबई दि ६ ऑगस्ट
: महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उमेश कोल्हे या व्यक्तीने भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या सोशलमिडीयावर पोस्ट केल्याच्या कारणावरून भरदिवसा त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. अशावेळी पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात असाच जीवघेणा हल्ला कर्जत तालुक्यात प्रतीक पवार या तरुणावर करण्यात आला आहे. या हल्ल्याचा थरार प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने स्वतः पोलिसांना सांगितला तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही पवार यांच्या कुटूंबियांनी पोलिसांकडे केली आहे.


या प्रकरणात, पोलिसांनी शाहरुख खान पठाण, सोहेल पठाण, निहाल खान पठाण, ईलाईल शेख, टिपू पठाण, अब्रार उर्फ
अरबाज कासम पठाण, अर्शाद पठाण, अकिब सय्यद आणि इतर ५ ते ७ अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच भा.दं.सं. कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९,३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर आरोपींवर ऍट्रॉसिटी कायद्यांअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पोलीस दिलेल्या फिर्यादीनुसार तपास करत आहेत. आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईही पोलीस करतील.


गुरुवारी दि. ४ रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या घटनेचे प्रमुख साक्षीदार आणि प्रतीक पवार हे दोघ राशिनला आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी आणखी काही मित्राच्या प्रतीक्षेत उभे असताना भर चौकात प्रतीक पवार यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला केला. चारचाकी आणि दुचाकीवर आलेल्या ५० ते ६० लोकांच्या जमावाने हा हल्ला केल्याचे यांनी पोलिसांना सांगितले. 


यावेळी या जमावातील लोक प्रतीक पवार यांना जातीवाचक शिवीगाळ करत असतानाच म्हणाले,तू सोशल मिडीयाला । support नुपुर शर्मा, कन्हैयालाल यांचे स्टेटस व इंस्टाग्रामवर माहिती टाकत असतोस तुझ्यामुळे इतर लोकही त्यांचे सपोर्टसाठी उभा राहू लागले आहेत. तुझा आम्ही उमेश कोल्हे करु, अशी धमकी या जमावातील एका आरोपीने प्रतीक पवार याला दिली. हे म्हणत असतानाच जमावाने धारधार हत्यार,दगड आणि हॉकीस्टिकने प्रतीक पवारला जबर मारहाण केली.


तसेच, बेशुद्ध झालेल्या प्रतीक पवार यांचा मृत्यू झाला असे समजून हे आरोपी पवार यांच्यावर अक्षरशः थुकले आणि शिवीगाळ करत निघून गेल्याचे, प्रतीक पवार यांचे मित्र आणि प्रत्यक्षदर्शी यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. यानंतर, जमाव निघून गेल्यांनतर मित्राच्या मदतीने प्रतीक पवार याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या प्रतीक पवार यांची प्रकृती गंभीर असून अहमदनगरमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121