"आम्ही मोदींना भीत नाही", ईडी कारवाईनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

    04-Aug-2022
Total Views |

rahul
 
 
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या यंग इंडियन या वृत्तपत्राच्या कार्यालयाला बुधवारी ईडीकडून तळे ठोकले गेल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले. ५ ऑगस्टला काँग्रेस संपूर्ण देशभर रस्तावर उतरून आंदोलन करेल, महागाईविरोधात एल्गार करेल असेही त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले. "सरकार आम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही मोदी सरकारला भीत नाही" असे राहुल यांनी सांगितले.
 
काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या यंग इंडियन या वृत्तपत्राबरोबरच गांधी घराण्याशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणावरही ईडी कडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांचीही चौकशी होणार आहे. यंग इंडियन वृत्तपत्राचे ३८ टक्के शेअर्स हे गांधी घराण्याकडे आहेत. याच वृत्तपत्राच्या आडून कोट्यवधींचे गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. "मोदी सरकारकडून होणारी ही कारवाई म्हणजे लोकशाहीवरचा घाला असून, खऱ्या प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये, त्यांची सातत्याने दिशाभूल व्हावी असाच मोदी सरकरचा डाव आहे" असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.
 
२०१० पासून यंग इंडियन वृत्तपत्राकडून कुठलेही सामाजिक कार्य झालेले नाही, ८०० कोटी रुपयांची एजेएलची मालमत्ता यांनी बेकायदेशीरित्या हडप करून ती भाड्याने देण्याचा उद्योग केला गेला आहे. या भांड्यातून येणारे पैसे सामाजिक करण्यासाठीच वापरले जातील हा अत्यंत फसवा युक्तिवाद आहे असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.