मुंबई : सध्या सर्वत्र गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. 1,039 कोटींच्या या घोटाळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव आल्याने या घोटाळ्याने राजकीय वर्तुळात एक वेगळाच भूकंप केला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या ‘गुरु आशिष कन्स्ट्रक्शन’ कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते.
मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. या घोटाळ्यामुळे अनेक नागरिक अद्याप आपल्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, या सर्वात अनेक व्यावसायिकही नाहक अडकले गेले आहेत. अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे उद्योजक राहुल भोसले यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले.
45 लाख अजूनही थकबाकी
’ऊएइणॠ 360 ऊशसीशश’ आणि नंतरची ’ऊएइणॠ उजठझजठअढखजछ’ या त्यांच्या कंपनींमार्फत कीटक नाशक फवारणी करण्यात येते. पत्राचाळ घोटाळ्याबाबत सांगताना राहुल भोसले म्हणाले की, “2010च्या आसपास पत्राचाळ आणि सिद्धार्थनगर सोसायटीच्या ‘आर 1’ पासून ‘आर 9’ पर्यंतच्या 45 एकरचा भाग ‘एचडीआयएल’च्या राकेश वाधवान आणि ‘गुरु आशिष’च्या प्रवीण राऊत यांनी तेथील स्थानिक विकासकाकडून ताब्यात घेतला. तसेच, स्थानिक मुंबई महापालिकेच्या पॅनेलवर असल्यामुळे ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’ निवारण्यासाठी त्या 45 एकरवर फवारणीचे कामदेखील आम्हाला मिळाले होते.
प्रत्येक आठवड्याला नियमित फवारणी करण्यात येत असल्यामुळे महिन्याला साधारणतः दीड ते दोन लाखांपर्यंत बिल होत असे. दरम्यान, ते सुरुवातीला आम्हाला कामासाठी आगाऊ रक्कम देत. त्यानंतर 30 दिवस क्रेडिट, 90 दिवस क्रेडिट अशा पद्धतीने ते पैसे आम्हाला देऊ लागले. पण, नंतर पैसे कधी यायचे, तर कधी नाही. शेवटी आमचे तब्बल 45 लाख अजूनही थकवलेले आहेत.”
यासंदर्भात अधिक माहिती देत राहुल भोसले पुढे म्हणाले की, “अनेक व्यावसायिकांची अनेक कोटींची रक्कम त्यांनी थकवली असून ’सरकारकडून आमचे पैसे आले नसल्यामुळे तुम्हाला पैसे देता येत नसल्याचे’ त्यावेळी आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु, इतर खर्च असतात. तसेच, कामगारांचा पगार देणे असल्यामुळे आम्ही त्यांचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. अनेकदा आमच्या पैशांची मागणी त्यांच्याकडे केली गेली. दरम्यान, 2016 नोटबंदीच्या वेळी त्यांनी दोन लाख रुपये आम्हाला दिले, ते शेवटचेच. नंतर 2018-19 दरम्यान ‘एचडीआयएल’ दिवाळखोरीत निघाली.
नुकसान असतानाही कायदेशीर लढत नाही.
राहुल भोसले म्हणाले की, “यासर्वांमध्ये ‘गुरु आशिष’ने आमचे म्हणजेच सर्व व्यावसायिकांचे ‘टीडीएस’ भरल्याने आम्ही कायदेशीरदेखील लढत देऊ शकलो नाही. कारण, ‘टीडीएस’ भरल्यामुळे कागदोपत्री असे दिसत होते की, आमचे सर्व पैसे मिळाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात माझे 45 लाख तर इतरांचे कोटींहूनही अधिक रक्कम अद्याप मिळालेली नाही. पण, जर त्यावेळी आम्ही त्यांनी दिलेली बिले बरोबर असल्याचे म्हटले नसते, तर आमच्या रकमेवरील ‘सर्व्हिस टॅक्स’ हा आम्हालाच भरावा लागणार होता. त्यातच आयकराकडूनही आम्हाला नोटीस येत होत्या.
त्यामुळे आम्हाला ती बिले ‘राईट ऑफ’ म्हणजे बरोबर असल्याचे सांगावेच लागले. मात्र, यापुढे आम्ही आमच्याच पैशांवर कोणताही दावा करू शकणार नाही, याचेच आम्हाला दुःख आहे. त्याचप्रमाणे सर्व दरवाजे बंद झाल्यामुळे आम्ही आम्हाला न्याय मिळेल, अशी आशाच सोडली होती.”परंतु, आता मात्र आम्हाला आशेचा एक किरण दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. ”आता जरी संजय राऊतांना अटक झालेली असली, तरी जोपर्यंत आमची देणी फेडण्याचा आदेश न्यायालय या कंपन्यांना व त्यांच्या मालकांना देत नाहीत, तोपर्यंत आम्हा उद्योजकांना न्याय मिळणार नाही,” असेही भोसले यांनी स्पष्ट केले.
45 लाख अजूनही थकबाकी
’ऊएइणॠ 360 ऊशसीशश’ आणि नंतरची ’ऊएइणॠ उजठझजठअढखजछ’ या त्यांच्या कंपनींमार्फत कीटक नाशक फवारणी करण्यात येते. पत्राचाळ घोटाळ्याबाबत सांगताना राहुल भोसले म्हणाले की, “2010च्या आसपास पत्राचाळ आणि सिद्धार्थनगर सोसायटीच्या ‘आर 1’ पासून ‘आर 9’ पर्यंतच्या 45 एकरचा भाग ‘एचडीआयएल’च्या राकेश वाधवान आणि ‘गुरु आशिष’च्या प्रवीण राऊत यांनी तेथील स्थानिक विकासकाकडून ताब्यात घेतला.
तसेच, स्थानिक मुंबई महापालिकेच्या पॅनेलवर असल्यामुळे ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’ निवारण्यासाठी त्या 45 एकरवर फवारणीचे कामदेखील आम्हाला मिळाले होते. प्रत्येक आठवड्याला नियमित फवारणी करण्यात येत असल्यामुळे महिन्याला साधारणतः दीड ते दोन लाखांपर्यंत बिल होत असे. दरम्यान, ते सुरुवातीला आम्हाला कामासाठी आगाऊ रक्कम देत. त्यानंतर 30 दिवस क्रेडिट, 90 दिवस क्रेडिट अशा पद्धतीने ते पैसे आम्हाला देऊ लागले. पण, नंतर पैसे कधी यायचे, तर कधी नाही. शेवटी आमचे तब्बल 45 लाख अजूनही थकवलेले आहेत.”
यासंदर्भात अधिक माहिती देत राहुल भोसले पुढे म्हणाले की, “अनेक व्यावसायिकांची अनेक कोटींची रक्कम त्यांनी थकवली असून ’सरकारकडून आमचे पैसे आले नसल्यामुळे तुम्हाला पैसे देता येत नसल्याचे’ त्यावेळी आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु, इतर खर्च असतात. तसेच, कामगारांचा पगार देणे असल्यामुळे आम्ही त्यांचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. अनेकदा आमच्या पैशांची मागणी त्यांच्याकडे केली गेली. दरम्यान, 2016 नोटबंदीच्या वेळी त्यांनी दोन लाख रुपये आम्हाला दिले, ते शेवटचेच. नंतर 2018-19 दरम्यान ‘एचडीआयएल’ दिवाळखोरीत निघाली.
नुकसान असतानाही कायदेशीर लढत नाही.
राहुल भोसले म्हणाले की, “यासर्वांमध्ये ‘गुरु आशिष’ने आमचे म्हणजेच सर्व व्यावसायिकांचे ‘टीडीएस’ भरल्याने आम्ही कायदेशीरदेखील लढत देऊ शकलो नाही. कारण, ‘टीडीएस’ भरल्यामुळे कागदोपत्री असे दिसत होते की, आमचे सर्व पैसे मिळाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात माझे 45 लाख तर इतरांचे कोटींहूनही अधिक रक्कम अद्याप मिळालेली नाही. पण, जर त्यावेळी आम्ही त्यांनी दिलेली बिले बरोबर असल्याचे म्हटले नसते, तर आमच्या रकमेवरील ‘सर्व्हिस टॅक्स’ हा आम्हालाच भरावा लागणार होता.
त्यातच आयकराकडूनही आम्हाला नोटीस येत होत्या. त्यामुळे आम्हाला ती बिले ‘राईट ऑफ’ म्हणजे बरोबर असल्याचे सांगावेच लागले. मात्र, यापुढे आम्ही आमच्याच पैशांवर कोणताही दावा करू शकणार नाही, याचेच आम्हाला दुःख आहे. त्याचप्रमाणे सर्व दरवाजे बंद झाल्यामुळे आम्ही आम्हाला न्याय मिळेल, अशी आशाच सोडली होती.”परंतु, आता मात्र आम्हाला आशेचा एक किरण दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. ”आता जरी संजय राऊतांना अटक झालेली असली, तरी जोपर्यंत आमची देणी फेडण्याचा आदेश न्यायालय या कंपन्यांना व त्यांच्या मालकांना देत नाहीत, तोपर्यंत आम्हा उद्योजकांना न्याय मिळणार नाही,” असेही भोसले यांनी स्पष्ट केले.