नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे अमेरीका-चीनमध्ये तणाव

    02-Aug-2022
Total Views |
नॅन्सी पेलोसी
 
 
 
तैपेई : तैवान एक स्वशासित लोकशाही देश असून ज्याचा चीनने आपला प्रदेश असल्याचा दावा केला होता. तैवान हा आपल्या वन चायना वन पॉलिसीचा भाग असून त्यामध्ये अमेरिकेने पडू नये, अशी भूमिका आतापर्यंत चीनने घेतली आहे. तैवान हा एक लोकशाही देश असून त्यावर चीन आपला दावा सांगतोय. त्यामुळे तैवानवरुन या दोन देशांदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावात भर म्हणुन अमेरिकेच्या सांसद अध्यक्ष नॅन्सी पेलोसी या मंगळवारी रात्री तैवानमध्ये आल्या आहे.
 
 
 
अमेरिकेला याची “किंमत चुकवावी लागेल” असा चीनने इशारा देऊनही यूएस सांसद अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांचे विमान तैवानमध्ये उतरले आहे. यामुळे दोन देशांदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे, नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील, तैपेई विमानतळ आम्ही बॉंबने उडवून देऊ अशी धमकी चीनने दिली होती. तशातही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये आल्या आहेत.
 
नॅन्सी पेलोसी यांच्या या दौऱ्यामुळे आशिया खंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झालं तर या युद्धात अनेक देश ओढले जातील. अमेरिकेच्या या कृतीमुळे मात्र चीन चांगलाच संतापला असून त्यांने आपल्या लष्कराचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. चीनने युद्ध सरावही सुरू केल्याची माहिती मिळत आहेत. चीनला रशियाने पाठिंबा दिला असून त्यांच्या बाजूने इराण या युद्धात उतरण्याची शक्यता असून अमेरिकेच्या बाजूने ऑस्ट्रेलिया, जपान युद्धात उतरतील.