नवी दिल्ली : "देशातील कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सीएए कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्याला आश्वस्त केले असल्याचे पश्चिम बंगालचे विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केले. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अधिकारी दिल्लीत आले असताना त्यांनी सीएए कायद्याच्या अंमलबजावणी बाबत शाह यांच्याशी चर्चा केली.
देशात सुरु असलेले कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम या सप्टेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. यानंतर सीएए अंमलबजावणीची सुरवात होईल. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमधून पळून आलेल्या मुस्लिमेतर निर्वासितांना भारताचे नागरिकत्व सीएए कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी विनंती अधिकारी यांनी शाह यांना केली होती जी शाह यांनी मान्य केली.
सीएए कायदा संसदेने पारित केलेला असल्याचे त्याच्या अंमलबजावणीला कोणी विरोध करू शकत नाही असे अधिकारी यांनी स्पष्ट केले. अधिकारी यांनी शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सीएए अंमलबजावणी बरोबरच तृणमूल काँग्रेसच्या १०० आमदारांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही या भेटी दरम्यान केली असल्याचे जाहीर केले आहे.