आता पाळी अनिल परबांची? किरीट सोमय्यांचे सूचक ट्विट

    16-Aug-2022
Total Views |
kirit
 
 
 
मुंबई : आधी अनिल देशमुख, मग नवाब मलिक, आता संजय राऊत, यापुढचा नंबर कोणाचा असणार याबद्दल उत्सुकता असताना आता ते पुढचे नाव शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब असल्याची दाट शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबद्दलचे सूचक ट्विट करत कारवाईचे संकेत दिले आहेत. अनिल परबांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार असल्याचे सोमैय्यांनी सूचित केले आहे. यांमुळे महाविकास आघाडीच्या आता अजून एका नेत्यावर ईडी कारवाईचा दट्ट्या बसणार असल्याची शक्यता आहे.
 
पर्यावरण मंत्रालयाकडे या बंगल्यासंदर्भात पाठपुरावा सुरु असून येत्या ३- ४ दिवसांत आदेश येण्याची शक्यता आहे, असे सोमैय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ३- ४ दिवसांतच हे रेसॉर्ट पडण्याचा अंतिम आदेश येईल. अनिल परब यांचे दापोलीचे साई रिसॉर्ट भ्रष्टाचाराच्या पैश्यांमधून उभे राहिलेले आहे असं आरोप किरीट सोमय्या यांनी त्याविरोधात मोहीमच उघडली आहे. सातत्याने त्या विरोधात पाठपुरावा करून त्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमय्या यांनी दापोलीत जाऊनही आंदोलन केले होते. ३१ जानेवारी २०२२ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने ९० दिवसांत हे रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते पण अजूनही त्यावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही.
 
 
 
 
 
 
नेमका आरोप काय ?
 
दापोली येथील मुरूड समुद्रकिनाऱ्याजवळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून अनिल परबांनी जमीन बळकावल्याचा आरोप आहे. याच्यापुढे जाऊन कुठलीही परवानगी न घेता त्या जमिनीवर रिसॉर्टचे बेकायदा बांधकामदेखील केले. अनिल परब यांनी ही जमीन अकृषक असल्याचे सांगितले जरी असले तरी २०२१च्या कागदपत्रांमध्ये ही जमीन आजही शेतजमीनच असल्याचे उघड झाले आहे. सोमय्या यांनी "दापोली येथील आपल्या आंदोलनात या सर्व गोष्टी उघड केल्या होत्या" असा दावा त्यांनी केला आहे.