दोडामार्गमध्ये विद्युत कुंपणामुळे गव्याचा मृत्यू

    11-Aug-2022
Total Views |

Gava
 


मुंबई:
दोडामार्ग तालुक्याच्या पंतुरली गावात विजेचा शाॅक लागून एका गवा रेड्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणी गव्याला विजेचा शॉक देऊन ठार केलेल्या संशयित आरोपीला कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतात घुसून सातत्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या असलेल्या पणतुलीं येथील सुनील भिकाजी गवस (वय ५१) याने या बाबतची माहिती वन विभागाला कळवली होती.
 
वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने  हा मृत्यू मंगळवार 9 ऑगस्ट रोजी झाल्याचा अहवाल दिला.पण तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार हा मृत्यू मंगळवारी दि. ८ ऑगस्ट रोजी झाल्याचे सांगितले.



पण तुर्ली येथील सुनील गवस यांनी आपल्या शेतात गवा रेडा मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागाला दिली होती. परंतु ही माहिती चुकीची असल्याचे समोर आल्यावर, पुढील चौकशी करण्यात आली. तेव्हा तक्रारदारानेच हा मृत्यू घडवून आणल्याचे समोर आले. वनविभागाने तत्काळ त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली. शॉक देण्यासाठी वापरलेली तार व आकडा जप्त करण्यात आले आहे.
 
 gavha 
 

या कारवाई दरम्यान प्रभारी उपवनसंरक्षक वर्षा खरमाटे, प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी मदन क्षिरसागर, खडपडे वनपाल रत्नराज गायकवाड कोनाळ वनपाल शिवराम शिरवलकर, वनरक्षक समाधान कोल्हे, रामराव मुकाडे, गणेश भोसले, भास्कर डोंगरे व वनमजुर हे उपस्थित होते.