रेल्वेच्या धडकेत होणारा वन्यजीवांचा मृत्यू कसा रोखायचा?

रेल्वेच्या धडकेत होणारा वन्यजीवांचा मृत्यू कसा रोखायचा?

    10-Aug-2022
Total Views |
tiger1
 
 
 
 
 

मुंबई(प्रतिनिधी): राजुरा विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी पाहटे एका सब अडल्ट वाघाचा मृत देह आढळून आला. पहाटेच्या सुमारास या वाघाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. बल्लारशाह-काझीपेठ सेक्शनवरील राजुरा-कन्हाळगाव दरम्यानच्या रूळाजवळ सुमारे दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला. ही धडक इतकी भीषण होती की वाघाचे शरीर अर्धवट उरले. डोके आणि पाय नाहीसे झाले होते.
 
 
चंद्रपूर आणि राजुरा परिसरातील रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेला हा सातवा वाघ आहे. या पूर्वी ११ जून २०२२ रोजी झाला होता. या धडकेत वाघाचे मागचे दोन्ही पाय तुटले होते. आणि कवटी चक्काचूर झाली होती. त्या आधी ८ मार्च २०२१ पिंडकेपार मार्गावरील मालवाहू गाडीने १२ महिन्यांच्या वाघाचा जीव घेतला होता. महाराष्ट्रात दर महिन्याला सरासरी दोन वाघांचा मृत्यू होत आहे. गेल्या पाच महिन्यांत राज्यातील वाघाचा हा १५ वा मृत्यू आहे. बल्लारशाह-काझीपेठ हा रेल्वे मार्ग हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील भागातून जातो. परिणामी, हा मार्ग वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गावर येतो. आणि योग्य उपाययोजना न केल्यामुळे अपघात होऊन मृत्यूला सामोरे जातात. बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी रोजच्या कामा करिता गेले असता तेथील 'गँगमन'ला हा मृतदेह आढळून आला.  
 
 
map
 
 
मानव-प्राणी परस्परसंवाद आणि संघर्ष कमी करण्यासाठी राज्य वन्यजीव बोर्डाने एका समितीचे गठन केले आहे. या समितीमध्ये रस्ते, रेल्वे, सिंचन विभाग, महावितरण या विभागांचा समावेश आहे. रस्ते आणि सिंचन विभ्यागाने वन्यजीव विषयक उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.परंतु दक्षिण पूर्व मध्य रेल्वे याचा अवलंब करताना दिसत नाही.
 
"या समितीने समितीने नेहमी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला जंगलातील संवेदनशील भागांमध्मये वेग मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. रेल्वे बोर्डाने आपल्या सर्व मोटरमना सूचना देणे गरजेचे आहे. आणि ताशी ६० किमी वेग मर्यादित करणे देखील प्रभावी होणार नाही. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रतिनिधीने देखील समितीच्या निर्णयाबद्दल रेल्वे बोर्डाला माहिती दिली नाही." असे राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले.