मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी ईडीकडून कारवाई सुरु झाली. ईडीकडून संजय राऊतांना ताब्यात घेण्यात आले आहे. येथून त्यांची पुढची चौकशी सुरु होईल. यातच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक सूचक विधान केले आहे. संजय राऊतांचा नंबर तर लागला पण आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांचा नंबर असणार आहे, असे विधान राणा यांनी केले आहे.
संजय राऊत यांच्या अटकेने माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचेही धाबे दणाणले असून त्यांचीही रवानगी तुरुंगात होणार असे विधान राणा यांनी केले आहे. अनिल परब यांच्यावर त्यांच्या दापोली जवळील मुरुड येथील साई रिसॉर्ट घोटाळ्याशी अनिल परब यांचा संबंध आहे. याच घटनेच्या चौकशीसाठी अनिल परब यांना ईडीचे समन्स आले होते. मुरुड ग्रामपंचायतीकडे अनिल परब यांनी या रिसॉर्टचा मालमत्ता कर भरल्याच्या सर्व पावत्या ईडीकडे सादर केल्या होत्या. या घोटाळ्याशी माझा काहीच संबंध नाही असे अनिल परब वारंवार सांगत आहेत.
अनिल परब यांच्या याच साई रिसॉर्ट घोटाळ्यावरून भाजपनेते किरीट सोमैया यांनी जोरदार मोहीम उघडून अनिल परब, उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत अजून किती दिवस ईडीच्या कारवाईपासून वाचत फिरणार असा सवाल देखील किरीट सोमैया यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परबांसारख्या घोटाळेबाजांना पाठीशी घातले गेले पण आता फडणवीस- शिंदे सरकारच्या काळात या घोटाळेबाजांची गय केली जाणार नाही हेच राऊतांवर झालेल्या कारवाईने सूचित होत आहे.