शिंदे सरकारची मोठी घोषणा; शिंदे-फडणवीस सरकारकडून पेट्रोल - डिझेलवरील व्हॅट करणार कमी!

    04-Jul-2022
Total Views |
vat
 
 
 
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावर आल्यानंतर राज्यात कोणते नवे बदल पाहायला मिळणार याकडे सर्व जनतेचे लक्ष्य होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला, त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात व्हॅट कपात करण्यास नकार दिला होता. पंतप्रधान मोदींकडून राज्यांना ही कर कपात करण्याचे आवाहन केले होते.
 
 
मुख्यमंत्री शिंदेंनी ४ जुलै रोजी भाजप पाठिंब्याचे सरकार असल्याने पेट्रोल - डिझेलवरील व्हॅट लवकरात लवकर कमी करण्याची घोषणा केली आहे. तर, आता शिंदे - फडणवीस सरकार अजून कोणते नवीन बदल राज्यात घडवून आणणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.