"होय! हे सरकार 'ईडी'चं! 'ई' फॉर एकनाथ 'डी' फॉर देवेंद्र"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार

    04-Jul-2022
Total Views |

fadnvis
 
 
मुंबई : "आमच्यावर आरोप होतो की आमच्याकडचे आमदार हे ईडीमुळे आले आहेत, होय हे सरकार ईडीचं आहे, ई म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र" अशा शब्दांत विरोधकांनी टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मी पुन्हा येईन यावर माझी खूप टिंगल केली गेली पण मी पुन्हा आलोच आणि येताना शिंदेंनाही बरोबर घेऊन आलो असाही टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला. फडणवीस - शिंदे सरकरने १६४ मते मिळवत विधानसभेत बहुमत प्रस्ताव दिमाखात जिंकला. आता पुढची अडीच वर्षे राज्यात शिंदेशाहीच असणार हे आता स्पष्ट झाले आहे.
 
 
वैयक्तिक आयुष्यात अतिशय संघर्ष करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उजळत गेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मुशीत टायर झालेले एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत आणि आज तोच सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसला आहे याचा अभिमान आहे आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे असे गौरवोद्गार फडणवीसांनी काढले. या पुढच्या काळात महाराष्ट्राचे हित साध्य करण्यासाठी आम्ही काम करू आणि कुठल्याही आकासाशिवाय काम करत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही फडणवीसांनी सदनात दिली.