मुंबई : " माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला कमी आमदारांचे पाठबळ असूनही मुख्यमंत्री म्हणून समर्थन दिले हा देवेंद्र फडणवीसांचा मोठेपणा " अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. विधानसभा अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत होते. याचवेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानले.
सर्वांना वाटत होते की आता देवेंद्र हेच मुख्यमंत्री होणार आणि शिंदेंना काहीच मिळणार नाही पण या सगळ्या समाजांना धक्का देत भाजपने आम्हांला समर्थन दिले याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. भाजपचा हा निर्णय फक्त राज्यातीलच देशातील सर्व पक्षांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय आहे अशी पुस्तीही मुख्यमंत्र्यांनी पुढे जोडली.