मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबाद मध्ये होत आहे. बैठक हैदराबाद मधील नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये दोन दिवसीय मंथन शिबिराच्या शेवटच्या दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पुढील तीस ते चाळीस वर्षात देशात भाजपचे युग असेल, असं अमित शहा यांनी म्हटले.
भाजपच्या कार्यकारणी बैठकीत वरिष्ठ नेत्यांसोबत भाजपशासित १९ राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत "पुढील तीस ते चाळीस वर्ष देशात भाजपचे युग असेल. यादरम्यान भारत विश्वगुरु होईल. 'घराणेशाही, वर्णद्वेष आणि तुष्टीकरण या देशातील राजकारणासाठी एकप्रकारे अभिशाप होता, जो देशातील लोकांच्या दुखाचं कारण होते." असे अमित शहा यांनी म्हंटले.
तेलंगणा आणि पश्चिम बंगाल मधील कौटुंबिक राजकीय सत्ता भाजप संपवेल. तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिसा मध्ये देखील लवकरच भाजपची सत्ता येईल. २०१४ पासून केंद्रात भाजपची सत्ता असूनही भाजप हा राज्यातील सत्तेपासून दुर आहे. अशी खंत देखील यावेळी अमित शहांनी बैठकीत बोलून दाखवली.
२००२ च्या गुजरात दंगलीवर सुप्रीम कोर्टाने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना दिलेल्या क्लीन चीटच्या विरोधात, दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जकिया जाफरी यांची याचिका फेटाळली. यावर निर्णयावर हा ऐतिहासिक निर्णय असालचे शहा यांनी म्हंटले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान शंकराप्रमाणे त्यांच्यावर भेकलेल्या सर्व विषाला पचवतात." असे अमित शहा यांनी म्हटले.