पुणे: उत्तरप्रदेशातील भदोई येथील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा (वय ३४) याला पुणे पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहेे. सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिस त्याचा शोधात होते. हडपसर परिसरात 'ऑक्सिजन विला' या अलिशान इमारतीत विष्णू मिश्रा भाड्याने घर घेऊन राहत होता. संशियत विष्णू याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेश मध्ये ४० वर्ष आमदार होते. गेल्या अनेक वर्षापूसन पोलिस त्याच्या शोधात होते.
उत्तरप्रदेश पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते, परंतु त्याचा ठावठिकाणा नव्हता. दहा दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेश पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले होते. मिश्रा याच्यावर गोपीगंज पोलीस स्टेशन, भदोई, उत्तरप्रदेश याठिकाणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याला गुन्ह्यात फरार घोषित करुन अपर पोलीस महानिदेशक वाराणसी यांनी त्याच्याबाबत माहिती देणार्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.