ऑन द ब्रिंक सीझन 2- (बॅट्स)ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!
"सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान चित्रपट पुरस्काराची घोषणा"
24-Jul-2022
Total Views | 50
मुंबई(प्रतिनिधी): ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. या मध्ये सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान चित्रपट म्हणून 'द हॅबिटॅट्स ट्रस्ट' आणि 'द गिया पीपल' निर्मित 'ऑन द ब्रिंक सीझन 2'- (बॅट्स)ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या माहितीपटाचे दिग्दर्शन आकांक्षा सूद सिंग यांनी केले आहे. या एपिसोडमध्ये, वटवाघुळ शास्त्रज्ञ अडोरा थाबाह यांनी वरॉटनच्या 'फ्री-टेल्ड बॅट'च्या शोधात गुहा या परीसंस्थेचे महत्व सांगितले आहे. वटवाघुळ या प्रजाती बद्दल लोकांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. हेच दूर करण्याचा प्रयत्न या माहितीपटाच्या माध्यमांतून केला आहे. या माहितीपटाची निर्मिती 'द हॅबिटॅट्स ट्रस्ट' आणि 'द गिया पीपल' यांनी संयुक्तरित्या केली आहे. २०२० सालचा सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान चित्रपट म्हणून 'ऑन द ब्रिंक सीझन 2'- (बॅट्स)ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.