मुंबई : जुलै महिना संपण्याची वेळ आली तरी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सीबीएसईच्या निकालामुळे अकरावी प्रवेश रखडलेले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत कॉलेज सुरू झाल्यास अकरावीचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांच्या हातात जेमतेम 100 दिवसांचा कालावधी शिल्लक असणार आहे.
नियमानुसार पहिली घटक चाचणी, सत्र परीक्षा, दुसरी घटक चाचणी आणि अंतिम परीक्षा घेणे कॉलेजना बंधनकारक आहे. मात्र अद्याप कॉलेजच सुरू न झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून पहिल्या सत्रातील परीक्षा कशा घ्यायच्या?, असा प्रश्न शिक्षकांसमोर असणार आहे.