ग्राऊंड झिरोच्या दणक्याने मुंबईकरांचे ७ कोटी वाचले!

शिवाजी पार्कसाठीच्या निविदेला प्रशासनाची स्थगिती

    20-Jul-2022   
Total Views | 172
shivaji park
 
मुंबई : दादरच्या सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आलेल्या विविध कामांवरून रंगलेल्या वादाला आता नवीन वळण लागले आहे. शिवाजी पार्कवर पावसाळापूर्व कामे करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोट्यवधींचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. मात्र, कंत्राटाला मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटातील काही त्रुटींवर आणि नमूद करण्यात आलेल्या काही गोष्टींवर बोट ठेवत स्थानिक दादरकर रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम राबवत या कामाला विरोध करायला सुरुवात केली होती.

तसेच, या संदर्भात स्थानिकांनी वारंवार मांडलेली भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मांडली होती. दरम्यान, स्थानिक रहिवासी आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या लढ्याला यश आले असून प्रशासनाकडून अखेर शिवाजी पार्कवरील कामाशी संबंधित असलेले हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाच्या निर्णयावर स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून याप्रकरणी पाठपुरावा केल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे आभार मानले आहेत.
 
बालहट्टामुळे होणारी उधळपट्टी वाचल्याचा आनंद

शिवाजी पार्कवरील धुळीचा त्रास आणि त्यातून निर्माण होणार्‍या इतर समस्यांमुळे स्थानिक रहिवासी दादरकर हैराण झाले होते. लहान मुलांना आणि विशेषतः ज्येष्ठांना याचा अधिक त्रास होत होता. प्रशासनातील या विभागाचे तत्कालीन अधिकार्‍यांवर असलेल्या दबावामुळे आणि बालहट्टामुळे कोट्यवधींची अक्षरशः उधळपट्टी होत होती. आमच्यावतीने संबंधित कंत्राटदारावर नोंदविण्यात आलेले आक्षेपदेखील प्रशासनाने मान्य केले असून, पुढील कामासाठी काढण्यात आलेले तीन कोटींचे नवे कंत्राटसुद्धा प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंची भूमिका आणि बालहट्टामुळे होणारी उधळपट्टी वाचल्याचा स्थानिक मुंबईकर म्हणून आम्हाला अतीव आनंद आहे. असे स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे, यांनी यावेळी म्हंटले.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..