मुंबई बंदरात रशियन जहाजांवर बंदी नाही; भारताचा अमेरिकेला थेट इशारा

    14-Jul-2022
Total Views |
port
 
 
 
मुंबई: युक्रेन-रशिया भारताने युद्धानंतर रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू आयात करण्याच्या भूमिकेवर असलेल्या अमेरिकेच्या हस्तक्षेपावर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेने मुंबई बंदर प्रशासनाला पत्र लिहून रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे मालवाहतूक करणाऱ्या रशियन जहाजांना भारतात येण्यास बंदी घालण्याची विनंती केली. परंतु, राष्ट्रीय हितासाठी जागतिक भागीदारांशी व्यवहार करणे हा भारताचा सार्वभौम अधिकार असल्याचे भारताने ठामपणे सांगितले.
 
मुंबईतील यूएस वाणिज्य दूतावासाने गेल्या महिन्यात थेट मुंबई बंदर प्रशासनाला पत्र लिहून रशियन जहाजांना बंदरात प्रवेश करण्यापासून रोखण्यास सांगितले होते. मुंबई बंदराने जहाजबांधणी महासंचालनालयाला पत्र लिहून परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दि. १३ रोजी मुंबई बंदराशी थेट संपर्क प्रस्थापित केल्याबद्दल अमेरिकेला सुनावले आहे. आणि सांगितले की राष्ट्रीय हितासाठी जागतिक भागीदारांशी व्यवहार करणे हा भारताचा सार्वभौम अधिकार आहे. कोणत्याही विशिष्ट देशाच्या जहाजांना आपल्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास देश परवानगी नाकारणार नाही.