ब्रिटनचे बोरिस जॉन्सन पंतप्रधान यांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुढील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत एक भारतीय वंशाच्या नागरिकांचे नाव चर्चेत आले ते म्हणजे ऋषी सुनक यांचे. ताज्या घडामोडी नुसार ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधन होण्याच्या अगदी जवळ पोचलेत कारण निवडणुकीच्या पहिल्या फेरीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो कोण आहेत हे ऋषी सुनक? भारतीय उद्योगपती नारायन मूर्ती आणि ऋषी सुनक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत का? महाराष्ट्रप्रमाणेच ब्रिटनमध्ये शिंदे पॅटर्न सारखा तक्ता पालट झालाय का? सुनक यांच्या रूपाने एक भारतीयवंशाचा माणूस ब्रिटनचा पंप्रधान होणार का? आणि त्याचे भारतावर काय परिणाम होतील?
ऋषी सुनक आणि भारत यांचा संबंध
ब्रिटनच्या कंजरव्हेटिव्ह पक्षाचे स्टार मानले जाणाऱ्या ऋषी सुनक यांचा जन्म युकेमधील साउथॅम्प्टन येथे झालाय. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी अशी ख्याती असलेल्या सुनक यांनी विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून देखील एमबीएचे शिक्षणही घेतले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इंफोसेसचे को फाऊडर नारायण मूर्ती आणि ऋषी सुनक यांचा संबंध काय आहे? तर ऋषी सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती आणि सुप्रसिद्ध लेखिका व उद्योजिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक यांच्या पत्नी ममता मूर्ती या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती या दाम्पत्याची मुलगी आहे. ममता मूर्ती आणि ऋषी सुनक यांचा विवाह बंगलोर येथे २००९ साली पार पडला. ममता आणि ऋषी यांना दोन मुली आहेत. त्यामुळे सुनक हे केवळ भारतीय वंशाचे नसुन ते भारतचे जावई देखील आहेत.
सुनक ब्रिटनच्या सत्ताकेंद्राजवळ कसे पोचले?
ब्रिटनच्या किंवा पाश्चात्य देशात नैतिकतेची व्याख्या थोडी वेगळी आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे खोटे बोलल्यास ते खपवून घेतले जात नाही. आणि नेमक्या याच गोष्टीमुळे सुनक, आज ब्रिटनच्या पंतप्रधानपदा जवळ पोचले आहेत. बोरिस जॉन्सन यांच्या घरी घडलेल पार्टी स्कॅंडल ब्रिटनसह जगभरात खूपच गाजलं. आपल्याघरी कोरोनाचे निर्बंध असताना कोणत्याही प्रकारची पार्टी झालीच नाही असे धडधडीत खोट बोलल्या मुळे आणि पुढे ते सिद्ध झाल्याने बोरिस यांची खुर्ची गेली. याच पार्टीत ऋषी सुनक देखील उपस्थित होते पण ते तिथे वेगळ्या कामाने गेले होते सुनक यांना त्या पार्टीची कोणतीही कल्पना नव्हती. सुरुवातीला सुनक यांच्यावर देखील चिखलफेक झाली पण मुळातच प्रामाणिक स्वभावाच्या ऋषी सुनक यांच्या बद्दलचा गैरसमज दूर झाले आणि सत्य उजेडात आले. ऋषी यांच्यावर खोटे आरोप होत असताना जॉन्सन मुद्दम मुग गिळून गप्प बसले होते, आणि असामाजिक वर्तनाचे आरोप होत असलेल्या पिंचर यांची चुकीची पाठराखण करण्यात व्यस्त होते, असे सांगण्यात येते. कदाचित सुनक यांचे ब्रिटनच्या राजकारणात वाढत असलेले महत्व देखील याला कारणीभूत असेल. ४२ वर्षीय ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सनयांच्या मंत्री मंडळात अर्थमंत्री होते. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनमधील एका सट्टेबाजाने ऋषी सुनक पंतप्रधान बनतील अशी भविष्यवाणी वर्तवलेली होती.
ब्रिटनमध्ये महाराष्ट्र किंवा शिंदे पॅटर्नद्वारे तक्ता पालट झालाय का?
मागे शरद पवारांच्या पावसातील भाषणाप्रमाणे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात जो बायडन यांच्या भाषणादरम्यान पाऊस सुरु झाला. आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी बायडन यांनी आमच्या पवारसाहेबांची कॉपी केली अशी राळ उठवली. पण आता चक्क ब्रिटनच्या राजकारणात महाराष्ट्राप्रमाणेच चाळीस खासदारांनी राजीनामा दिला आणि बोरिस जोन्सन याचं सरकार अडचणीत आलं. ज्यापद्धतींने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ४० आमदारांना सोबत घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची खेचली, तसाच प्रकार ब्रिटन मध्ये घडला. अर्थात या दोघांची पार्श्वभूमी वेगळी असली तरी ४० या आकड्यात साम्य आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाकडे ३३ देशांचे लक्ष होते, त्या देशांनी महाराष्ट्रातील घटनेची नोंद घेतली अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने ब्रिटन मध्ये शिंदे पॅटर्नद्वारे तक्ता पालट झालाय का? अशा गमतीदार प्रश्नाची शिंदेसमर्थकांमध्ये चर्चा आहे.
ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यास त्याचे भारतावर काय परिणाम होतील?
युकेचे माजी पंतप्रधान डेव्हिड कामेरून यांच्या काळापासून भारतीयांना ब्रिटनमध्ये चांगल्या सुविधा मिळू लागल्याचे सांगितले जाते. जॉन्सन प्रशासन हे भारत समर्थक मानले जात होते. जॉन्सन यांच्या जाण्याने आणि सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यास आंतरराष्ट्रीय राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक सांगतात. आशिया-पॅसिफिकमधील ब्रिटनची भूमिका असो किंवा चीनविरुद्धचे धोरण असो यात बदल होणार नाही. तर सुनक यांच्या रूपाने भारतासोबतचे ब्रिटनचे धोरण पूर्वीप्रमाणेच मनमिळाऊ आणि अधिक मजबूत होतील, असेही सांगितले जाते. ज्या ब्रिटीशानी एकेकाळी भारतावर राज्य केले त्याच ग्रेट ब्रिटनचा पंतप्रधान होण्याचा मान भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना मिळणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच.