प्राजक्ता सांगतेय तिच्या अध्यात्मिक गुरुंबद्दल ....

    13-Jul-2022
Total Views |
 
 
 
 
mali
 
 
 
 
 
मुंबई : 'रानबाजार' वेब सिरिजमुळे आणि 'वाय' सिनेमामुळे सध्या मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळीची चर्चा सुरु आहे. प्राजक्ता नेहमीच सोशल मिडीयावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त तिने आपल्या गुरुंबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
 
 
 
 
 
आज प्रत्येक जण आपल्या गुरुंबद्दल भावना व्यक्त करत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारही आपल्या गुरुंबद्दल लिहित आहेत. प्राजक्ता माळी हीने आपल्या आध्यात्मिक गुरुंबद्दल लिहिले आहे. यामध्ये तिने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांचा आहेत. तर दुसऱ्या फोटोत आध्यात्मिक गुरू ओशो आणि तिसऱ्या फोटोत भगवान गौतम बुद्ध दिसत आहेत. या फोटोला तिने अत्यंत भावनिक कॅप्शन दिले आहे.
 
 
 
 
 
प्राजक्ता म्हणते, 'माझे ३ अध्यात्मिक गुरु आहेत पहिले 'श्री श्री रवी शंकरजी. ज्यांनी मला 'सुदर्शन क्रिया' आणि जगण्यात 'ध्यान' करण्याचा मार्ग दाखवला. दुसरे म्हणजे ओशो, ज्यांनी 'ना भोगो ना त्यागो वरन जागो' हा क परम मंत्र दिला आणि तिसरे गौतम बुद्ध, ज्यांनी मला जीवनाचे तत्वज्ञान शिकवले. मला वाटते, त्यांनी माझ्या मनावर आणि हृदयावर संस्कार करुन मला जीवनाचे उद्दिष्ट दाखवले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पुढे प्राजक्ता म्हणते, 'कधी कधी आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगायला भीती वाटते… ते जाहीर केल्यावर तंतोतंत पाळायची जबाबदारी येते. आणि कधी कधी ते बदलतं देखील. (Coz change is the only constant thing.) पण माझा आत्ता ह्या क्षणी ह्यांच्यावर विश्वास आहे हे सांगायला हवं, अस मला वाटतं. आणि मी माणूस आहे. पुढे जाऊन मी चुकेन, हरवेन; पण एका माणसामुळे तुम्ही तुम्हांला पटलेल्या “ज्ञानावरचा” विश्वास गमावू नका. ज्ञानावर संशय घेऊ नका.
 
 
 
 
 
असो, भारतीय गुरू परंपरेतील सर्व गुरूंना, आई- वडील, माझ्या नृत्य आणि योग गुरूंना, शालेय- कॅालेज शिक्षकांना तसेच माझ्या नकळत ज्यांनी ज्यांनी मला घडवलं त्यांना माझा हा virtually साष्टांग दंडवत', असे प्राजक्ता माळीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.