एकाच वर्गाची लोकसंख्या वाढणे म्हणजे अराजकतेस निमंत्रण – योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशात माता आणि बालमृत्यूदरात घट, रुग्णालयात प्रसुतीचे प्रमाण ८४ टक्के

    11-Jul-2022
Total Views | 64
yogi

लोकसंख्या असंतुलन देशासाठी घातक
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशात लोकसंख्या नियंत्रणाची अत्याधिक गरज आहे. देशातील कोण्या एका समुदायाचा लोकसंख्यावाढीचा दर जास्त असणे आणि त्या तुलनेत मूळ रहिवाशांचा लोकसंख्यावाढीचा दर कमी असणे योग्य नाही. अशाप्रकारचे लोकसंख्येचे असंतुलन हे देशासाठी घातक आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी व्यक्त केले. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम यशस्वीपणे पुढे जायला हवा. मात्र, आपण कुटुंबनियोजन आणि लोकसंख्या स्थिरिकरणाविषयी बोलतो, त्यावेळी लोकसंख्या असंतुलनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातील कोण्या एका वर्गाची लोकसंख्या वाढण्याचा दर जास्त असावा आणि त्या तुलनेत जे मूळ रहिवाशांच्या लोकसंख्या वाढीचा वेग जागरुकता आणि स्थिरिकरणाद्वारे कमी करून लोकसंख्या असंतुलनाची स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
 
 
 
 
अशाप्रकारे लोकसंख्या असंतुलनाची स्थिती ज्या ज्या देशांमध्ये निर्माण होते, त्या त्या देशांमध्ये धार्मिक लोकसंख्येविषयी समस्या निर्माण होतात. विशिष्ट कालावधीनंतर तेथे अव्यवस्था आणि अराजकता निर्माण होते. त्यामुळे ज्यावेळी आपण लोकसंख्या स्थिरिकरणाविषय़ी बोलतो, त्यावेळी जात, धर्म, भाषा याप्रकारचे भेदभाव होता कामा नये, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
 
मानवाला १०० कोटींपर्यंत पोहोचायला लाखो वर्षे लागली, मात्र १०० ते ५०० कोटींपर्यंत पोहोचायला फक्त १८३ ते १८५ वर्षे लागली. या वर्षाच्या अखेरीस, जगाची लोकसंख्या ८०० दशलक्ष होण्याची शक्यता आहे. आजचा भारत १३५ ते १४० कोटी लोकसंख्येचा देश आहे. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. सध्या राज्याची लोकसंख्या २४ कोटी असून ती काही काळातच ती २५ कोटींच्या पुढे जाणार आहे.
 
त्याचवेळी उत्तर प्रदेशात माता अशक्तपणाचे प्रमाण ५१.१ टक्क्यांवरून ४५.९ टक्क्यांपर्यंत खाली आहे. गेल्या पाच वर्षांत संपूर्ण लसीकरण ५१.१ टक्क्यांवरून वरून ७० टक्के झाले आहे.. रुग्णालयात प्रसूतीचा दर पूर्वी केवळ ६७ ते ६८ टक्के होता. मात्र, सरकारच्या प्रयत्नांनी तो दर आता ८४ टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे माता आणि बाल मृत्यूचे प्रमाणही नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत

आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत

जागतिक स्तरावरील सर्जनशील आशयनिर्माते, मनोरंजन विश्वातील नामांकित उद्योग कंपन्या, व्हीएफएक्सपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताखाली आणणारी मुंबईतील वेव्हज शिखर परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. १ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या निमित्ताने मुंबई भेटीवर असलेल्या विविध देशातील शिष्टमंडळाचे गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. चित्रनगरीत सुरू असलेले चित्रीकरण, विविध सेट्स यांना भेट देत त्यांनी चित्रिकरणाविषयी सविस्तर..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121