कोस्टल कोकण तर्फे इंग्रजी मॅगझीनचे प्रकाशन.

    05-Jun-2022
Total Views |
 
kokan
 
 
 
 
मुंबई:  दि. ४ जुन २०२२ रोजी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात कोकणातील प्रवास, खाद्य संस्कृती आणि उद्योजकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून 'कोस्टल कोकण' या संस्थेने इंग्रजी भाषेतून मॅगझीन प्रकाशित केले. कोकणातील उद्योग व रोजगारात वाढ व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर मॅगझीनच्या उद्‌घाटनासाठी नितेश राणे, अभिनेते संदीप कुलकर्णी, श्री. अशोकराव दुगाडे, श्री. अनंत भालेखन आणि कार्यक्रमाचे आयोजक श्री. प्रदीप मांजरेकर व सौ. रचना अमित लचके-बागवे मंचावर उपस्थित होते.
 
 
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणाच्या विकासासाठी झटणाऱ्या युट्यूबर्स आणि उद्‌योजकांना 'कोकण गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचा परिसंवाद घेण्यात आला. श्री. नितेश राणे यांनी हे मॅगझीन जगभरात पोहचावं, चित्रपटसृष्टीने कोकणात यावं, अनोळखी स्थळांना लोकोपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त यश कोकणातल्या लोकांना मिळावं अस आवाहन केलं. संदीप कुलकर्णी यांनी श्वास चित्रपटाच्या शूटींग मागचं कारण कोकणच्या निसर्ग सौंदर्यासाठी किती समर्पक होते, हे उपस्थितांना सांगितले आणि जास्तीत जास्त चित्रपट कोकणात घडावेत अशी इच्छा व्यक्त केली.