नुकतेच बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वांना धक्का बसला असतानाच त्याच्या चेहऱ्यावरील जखमेमुळे हा मृत्यू अनैसर्गिक आहे असे म्हणणे होते. परंतु, तपासनानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. कॉन्सर्ट सुरु होण्यापूर्वी आपली तब्येत ठीक नसल्याचे, अंग दुखत असल्याचे त्याने पत्नी ज्योती यांस सांगितले. हीच बाब त्याने आपल्या मॅनेजरला देखील सांगितली.
केके च्या डोक्यावर, चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आहेत, परंतु तपासानंतर पोलीस म्हणाले, जेव्हा केके कॉन्सर्ट संपून आपल्या हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी गेला असता सोफ्यावर बसण्याचा प्रयत्न करत होता पण तोल जाऊन तो खाली पडला आणि म्हणून त्याच्या चेहेऱ्याला आणि डोक्याला मार लागला. त्यामुळे मॅनेजरने तातडीने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने त्यास सीएमआरआय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांना त्याच्या हॉटेलच्या रूम मध्ये एंटासिह, व्हिटॅमिन सी आणि काही होमिओपॅथिक औषध सापडलीत. त्याची ही नियमित औषध सुरूच होती. एवढेच नाही तर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये देखील केकेच्या हृदयात ८० ब्लॉकेजेस होते, असे डॉक्टरांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. आणि अशा अवस्थेत कॉन्सर्टमध्ये उत्साहाच्या भरात तो गर्दीत नाचत होता आणि त्यामुळेच त्याच्या हृदयापर्यंत रक्त पोहचणे बंद झाले होते. आणि त्यामुळे केके याचा मृत्यू झाला हे स्पष्ट झाले.