पुणे: प्रवीण मसाले या सुप्रसिद्ध ब्रँड चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचे आज दि.३ जून रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
१९६२ मध्ये त्यांनी ' प्रवीण मसाले ' ची स्थापना केली होती. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या उद्योगाचा दर्जा टिकवून ठेवला आहे.
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात त्यांचा जन्म झाला.त्यांच्या पत्नी कमल यांनी त्याकाळी त्यांना मसाले विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा दिली, त्यातून त्यांनी उद्योग जगतात आपल्या प्रयत्नांनी मोठे साम्राज्य उभे केले. प्रवीण मसाले या ब्रांडची ओळख आज त्यामुळे जागा हर आहे.
त्यांच्या पश्चात राजकुमार, डॉ.प्रवीण,प्रदीप आणि धन्यकुमार ही चार मुले सुना , नातवंडे असा परिवार आहे.