ओवैसींच्या स्वागतात पाकिस्तान समर्थक घोषणा

रांची विमानतळावर इस्लामवाद्यांकडून घोषणा

    20-Jun-2022
Total Views |
owaisi


 
रांची: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी रांची विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वादग्रस्त व्हिडिओच्या चौकशीसाठी दंडाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षकांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
दरम्यान, राची वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनीही या घटनेच्या तपासासाठी एक पथक तयार केले आहे. ओवेसी समर्थकांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी रांची येथे गेले होते. विमानतळावर पोहोचल्यावर त्यांच्या एका समर्थकाने ६-७ वेळा ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. अज्ञात इस्लामी अजूनही फरार आहे. टाईम्स नाऊने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला पाकिस्तान समर्थक घोषणा देताना ऐकू येत आहे.
देशविरोधी घोषणाबाजीत अनेक लोक सहभागी झाले असावेत. यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये, अमुल्य लिओना या डाव्या विचारसारणीच्या मुलीने बेंगळुरूमध्ये सीएए विरोधी रॅलीत 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला होता. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत ही घोषणाबाजी करण्यात आली.
 
“पाकिस्तान झिंदाबाद आणि हिंदुस्तान झिंदाबाद या मधला फरक आहे…” असे म्हणे पर्यंत पोलीस आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्यांनी तिला स्टेजवरून खाली खेचले. त्याआधी तिने स्टेजवर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, ओवेसी यांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने ती तिचे भाषण पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ राहू शकली नाही.