मंगळुरूजवळ मलालीतील मशिदीत हिंदू मंदिराचे अवशेष!

विश्व हिंदू परिषदेकडून न्यायालयीन सर्वेक्षणाची मागणी! न्यायालयात सुनावणी सुरू!

    02-Jun-2022
Total Views |
malali123
 
 

 
मंगळूरू: मंगळुरूच्या मलाली येथील मशिदीच्या आत 'मंदिराच्या सदृश वास्तूचा शोध' याविषयी विश्व हिंदू परिषदेने कर्नाटकातील एका स्थानिक न्यायालयात मंगळवार दि. 31 मे रोजी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू केली आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंनी समर्थनार्थ कागदपत्रे सादर केली आहेत. त्
 
असायद अब्दुल्लाहिल मदनी मशीद प्रशासकीय समितीचे वकील मंगळवारी विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) याचिकेला विरोध करण्यासाठी तिसऱ्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात हजर झाले. मस्जिद समितीचे वकील प्रामुख्याने प्रार्थना स्थळ कायदा १९९१ वर अवलंबून होते. विश्व हिंदू परिषदेने एक याचिका पुन्हा सादर केली ज्यामध्ये त्यांनी 'मंदिरासारखी रचना' तपासण्यासाठी न्यायालय-नियुक्त आयोगाची मागणी केली आहे. हिंदू पक्षाने दाखल केलेल्या पहिल्या याचिकेत मलाली मशिदीच्या धार्मिक वैशिष्ट्याची पडताळणी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) कडून मशिदीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी मागितली होती. दुसरी याचिका आता न्यायालय-नियुक्त आयोगाची मागणी करत आहे जो एएसआयच्या मदतीने मंदिराचा अभ्यास करेल. उल्लेखनीय आहे की वाराणसीच्या ज्ञानवापी संकुलातील विवादित संरचना आणि तथाकथित मशिदीबाबत असेच सर्वेक्षण करण्यात आले होते.
 
गेल्या महिन्यात, नूतनीकरणाच्या उद्देशाने मशिदीचा काही भाग पाडण्यात आला आणि त्यावेळी त्या ठिकाणी ‘मंदिरासारखी रचना’ निदर्शनास आली. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नूतनीकरणाचे काम मशिदी समितीने सुरू केले होते आणि त्यांनी मशिदीचा पुढचा भाग पाडला तेव्हा तेथे एक “कलश” (स्पायर), “तोमारा” (स्तंभ) आणि मंदिरासारखे खांब सापडले. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.