आदित्य ठाकरे मागणार योगी आदित्यनाथांकडे मदत?

    15-Jun-2022
Total Views |
 y
 
 
 
 
अयोध्या : शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातून अनेक भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येत असतात. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी सुमारे १०० खोल्यांचं प्रशस्त सदन या ठिकाणी आपण उभारणार आहोत. तसेच त्यासंबंधी आदित्य ठाकरे स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी खासदार संजय राऊत हे देखील आदित्य यांच्या सोबत उपस्थित होते.
 
 
 
रामलल्लाचं दर्शन घेण्यापूर्वी आदित्य इस्कॉन मंदिरातही गेले होते. आपला अयोध्या दौरा ठरला त्यावेळी इस्कॉन मंदिर प्रशासनाकडून मला ई-मेल आला. असे सांगत सत्तरच्या दशकात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी इस्कॉन मुंबईला मदत केली होती. ही आठवण सांगत तेच नातं पुढे घेऊन जाण्यासाठी मंदिराकडून आपल्याला अयोध्येतील इस्कॉनला भेटीचं निमंत्रण दिलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. इस्कॉन मंदिरात प्रसादाचा लाभ घेतल्यावर आदित्य विश्रांतीसाठी हॉटेल त्रिमूर्तीमध्य गेले.
 
 
 
हा दौरा राजकीय नसून तीर्थ यात्रा असल्याचे स्पष्ट करत, गेल्या तीन वर्षात आपण शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे. आता राम मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक रामजन्मभूमीत आले आहेत. सन २०१८मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत पहिल्यांदा आलो होतो.
 
 
तब्बल ३५ तासांच्या प्रवासानंतर अनेक शिवसेना कार्यकर्ते पहाटे अयोध्येत पोहचले. अयोध्येत पोहचताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हजारो शिवसैनिकांसह कालच अयोध्येत दाखल झालेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीची जोरदार तयारी शिवसेनेनं केलीय.
 
 
 
प्रभू श्रीराम यांच्या आधी हनुमंताचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. तसे न केल्यास दर्शन सफल होत नाही अशी मान्यता आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनी अयोध्येतील हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेतले. काही वर्षात अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे त्यामुळे सध्या हिंदुत्वाच्या मुद्याला बगल देणाऱ्या ठाकरे सरकारने, योगी आदित्यनाथांच्या मदतीने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारल्यास ते महाराष्ट्रातील प्रभू श्रीराम भक्तांच्या दृष्टीने सोईचे ठरेल.