
ठाणे: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याकारणाने, भिवंडी परिसरात जमावाने २ भावांची मारहाण केली. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याकारणानं, पोलिसांनी दोघांना अटक केली. भिवंडीचा रहिवासी २० वर्षीय साद अशफाक अन्सारी ह्याची नूपूर शर्माला समर्थन करणारी सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर, रविवारी जमावाने त्याच्यावर हल्ला केला. अन्सारी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३अ (धर्म, वंश, जन्मस्थान आणि निवासस्थानाच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अन्सारीच्या घराबाहेर जमलेल्या जमावानं त्याला कलमा (इस्लामी विश्वासाची पुष्टी) वाचण्यास भाग पाडले. अन्सारीची यानंतर मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फराज फजल बहाद्दिंग उर्फ बाबा याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भिवंडीतील नारपोली भागात रविवारी झालेल्या आणखी एका घटनेत, त्याचा भाऊ मुकेश चव्हाण (२२) हा फार्मसी डिप्लोमाचा विद्यार्थी याने सोशल मीडिया साईटवर पोस्ट केल्याने सुमारे १०० लोकांच्या जमावात काही व्यक्तींनी हल्ला केला. शर्मा यांचे समर्थनातं पोस्ट पाहिल्यानंतर चव्हाण यांच्या घराभोवती जमाव जमला आणि त्यांच्या भावाला मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले. नारपोली पोलिसांनी चव्हाण यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आणि नंतर शर्माला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना अटक केली आणि अज्ञात लोकांविरुद्ध दंगल, बेकायदेशीर सभा आणि मारहाण केल्याबद्दल एफआयआर नोंदवला. भिवंडीतील पोलिसांनी शर्मा यांना शनिवारी समन्स बजावून त्यांना त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते.