मुंबई : रेल्वे मध्ये सीईएन ०१/२०१८ असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, त्यात मुंबई आरआरबीच्या पात्र वेटलिस्टवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या आरआरबीच्या उमेदवारांना आरआरबी मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली, यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील वेटलिस्टवर असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती.
ही बाब केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या, त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज मागवून मुंबईच्या वेटलिस्ट उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. याविषयी नोटीफिकेशन काढले असून, त्यामुळे मुंबईच्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. तसेच भारतातील आरआरबीच्या एकूण ७४०० उमेदवारांची कामे मार्गी लागणार आहे.
रेल्वे बोर्डाकडून आरआरबी मार्फत गरजेनुसार लोको पायलटची परिक्षा घेतली जाते. त्यानुसार मेन पॕनल व वेटींग लिस्टची नावे जाहीर करण्यात येतात. केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी महाराष्ट्रातील या उमेदवारांवर होणारा अन्याय होऊ दिला नाही. आरआरबी मुख्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन व या विषयाचा सतत पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला.
रेल्वे राज्यमंत्री दानवे साहेबांच्या कार्यतत्परतेमुळे मुंबईच्या ४४८ उमेदवारांसहीत भारतातील आरआरबीचे एकूण ७४०० एएलपी वेटींग उमेदवारांच्या नोकरीची कामे मार्गी लागणार आहेत. गेली अडीच वर्षे रखडलेले काम रेल्वे राज्यमंत्री दानवे साहेबांच्या सतर्कतेमुळे सफल झाले आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.