आम्ही फडणवीसांसोबतच - आ. रवी राणा

    01-Jun-2022
Total Views |
 
ravi
 
 
 
 
 
मुंबई : "राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबत जाणार आहोत" असा दावा आ. रवी राणा यांनी केली आहे. अपक्ष आमदारांचा कल आणि सन्मान हा देवेंद्र फडणवीसच करू शकतील असेही रवी राणा यांनी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा फडणवीसच अपक्ष आमदारांना नीट सांभाळू शकतील असा विश्वासही रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
राज्यसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. सर्व पक्षांच्या अधिकृत आमदारांसोबत अपक्ष आमदारांचा पाठिंबा कोणाला ? यासाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत, पण आता अपक्ष आमदारांचा कल हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचे आत स्पष्ट झाले आहे. आता या निवडणुकीकेले चुरस वाढली असून काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.