दिल्ली : खा. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारींवर संसदेची विशेषाधिकार समिती चौकशी करणार आहे. २३ मे रोजी संसदेची विशेषाधिकार समिती या बद्दल सुनावणी करणार आहे . नवनीत राणा याच संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सोमवारी संध्याकाळी भेट घेणार आहेत. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली असून त्याची ओम बिर्ला यांनी दखल घेतली आहे.
आपल्याला तुरुंगात असताना वाईट वागणूक दिली गेली. पिण्याचे पाणी मिळू दिले नव्हते तसेच प्रसाधनगृहाचादेखील वापर करू दिला नव्हता. आपल्याला अत्यंत वाईट वागणूक देऊन १४ दिवस तुरुंगात डांबले गेले या सर्व गोष्टींची तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही रान दाम्पत्याल महाराष्ट्र पोलिसांनी इंग्रज सरकारसारखी वागणूक दिली असा आरोप केला होता.